पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

सकाळ संवाद

काळभोरनगर जवळील सेवा रस्ता खराब
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर काळभोरनगर जवळली सेवा रस्ता प्रचंड खराब झाला आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर सांडपाण्याचे पाट वाहत आहेत. रस्त्यावरुन चालताना पादचाऱ्यांच्या आणि दुचाकीचालकांच्या अंगावर घाण पाणी उडते. दुचाकीचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. मेट्रो कामामुळे अगोदरच रस्ता अरुंद झाला आहे. त्यात आता रस्ता खराब असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
- ओमकार झगडे,
फोटो आयडी ः 98328
-------
चेंबरची जाळी दुरुस्त करावी
काळेवाडी रोडवरील चित्तरव गणपती मंदीरासमोरील चेंबरची जाळी खचली असून तेथे कधीही अपघात होण्याची शक्यता आहे. तरी महापालिका प्रशासनाने अपघाताची वाट न पाहता सदरची जाळी नव्याने बसवावी.
- देवबाप्पा, चिंचवड
फोटो आयडी - 98329
----------
उड्डाणपुलाचे नाव दुरुस्त करावे
निगडी येथे टिळक चौकात बांधलेल्या उड्डाणपूलाला मधुकर पवळे यांचे नाव देण्यात आले होते. पण नावाअगोदर ‘महापौर’ हा शब्द लावलेला नसून नुसतेच ‘दिवंगत मधुकर पवळे उड्डाणपूल’ असे नाव दिले आहे. त्यामुळे फलकावर ‘दिवंगत महापौर मधुकर पवळे उड्डाणपूल’ असा बदल करावा. अशी विनंती मनपा अधिकाऱ्यांना केली आहे.
- शिवराम वैद्य,
फोटो आयडी - 98339

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT