पिंपरी-चिंचवड

घशाच्या कर्करोगावर ज्येष्ठाची मात

CD

तळेगाव दाभाडे, ता. २४ ः घशाच्या कर्करोगावर यशस्वी मात करत ७४ वर्षीय रुग्णाने पुन्हा आवाज मिळवला आहे. तळेगाव दाभाडे येथील खासगी रुग्णालयांत त्यांनी उपचार घेतले. आधुनिक प्रिसिजन ऑन्कोलॉजी उपचार पद्धतीमुळे त्यांचे स्वरयंत्र वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. यामुळे कर्करोगावर यशस्वी मात करता येऊ शकते, हा सकारात्मक संदेश मिळाला आहे. रुग्णाला तंबाखूचे व्यसन होते. त्यांचा आवाज हळूहळू बसला. मानेच्या उजव्या बाजूला वेदनारहित गाठ दिसून आली. तीन महिन्यांत आवाज अधिकच कमजोर झाला. थोडे बोलले तरी त्यांना थकवा येऊ लागला. सतत आवाज बसणे, गिळताना त्रास होणे आणि मानेवर सूज अशी लक्षणे होती. तपासणीत कर्करोग असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर आधुनिक हेलिकल टोमोथेरपी आणि सिस्प्लॅटिन केमोथेरपी उपचार यशस्वी झाले. स्वरयंत्राचे जतन करण्यासोबतच कर्करोगावर संपूर्ण नियंत्रण मिळविले. उपचारानंतर १६ आठवड्यांत रुग्णाचा आवाज स्पष्ट झाला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

कधीकधी भीती वाटते... 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीने घेतलाय लग्नाचा निर्णय; कारण सांगत म्हणाली- आई-बाबा बीडला...

Mumbai Police Arrest 25 Bangladeshis : मुंबई पोलिसांनी सापळा रचून २५ बांगलादेशींना केली अटक ; बनावट कागदपत्रेही जप्त

Viral Video : हेलिपॅड, 100 एकरची जागा आणि भव्य फार्महाऊस ; कोई मिल गया फेम खलनायकाची प्रॉपर्टी पाहून येईल चक्कर !

SCROLL FOR NEXT