पिंपरी-चिंचवड

एसटीच्या स्वतंत्र कार्डमुळे प्रवाशांची कोंडी

CD

पिंपरी, ता. २५ : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या ‘बेस्ट’, ‘एमएमआरसी मेट्रो’ आणि पुणे मेट्रोनंतर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) प्रणाली लागू केली आहे. पण, प्रत्येक सार्वजनिक वाहतूक संस्थेच्या वेगवेगळ्या कार्डमुळे ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ योजनेचा बोजवारा उडाला आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमाअंतर्गत डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात आहे. नागरिकांना सर्व ठिकाणी एकाच कार्डच्या माध्यमातून पैसे देता यावेत, म्हणून केंद्र शासनाने ४ मार्च २०१९ रोजी ‘एक राष्ट्र, एक कार्ड’ हे ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) लॉन्च केले होते. हे डेबिट/प्रीपेड कार्ड मेट्रो, बस, उपनगरीय रेल्वे, पार्किंग आणि टोल यांसारख्या विविध ठिकाणी वापरता येत आहे. तसेच किरकोळ खरेदीसाठीही हे कार्ड संपूर्ण देशात वापरता येते. महाराष्ट्रातही ‘बेस्ट’ने सर्वप्रथम २६ एप्रिल २०२२ पासून ‘चलो कार्ड’ (एनसीएमसी) सुरू केले.
मुंबई मेट्रोने ‘मुंबई वन’ एनसीएमसी कार्ड सुरू केले. हे कार्ड लोकल ट्रेन, मोनोरेल आणि बेस्टसह मेट्रोत वापरता येत आहे. पुण्यातही मेट्रो प्रशासनाने २०२३ मध्ये ‘एक पुणे’ कार्ड लॉन्च केले. आता एसटी महामंडळाने ‘एनसीएमसी’ प्रणाली लागू केली असून, यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य केले आहे.  
केंद्र शासनाचे ‘एक राष्ट्र, एक कार्ड’ असतानाही राज्यातील विविध सार्वजनिक वाहतूक सुविधा देणाऱ्या संस्थांनी स्वतःचे ‘एनसीएमसी’ कार्ड सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांना मेट्रो, बेस्ट, पीएमपीएमएल, एसटी आणि इतर जिल्ह्यांतील सार्वजनिक बस सुविधा देणाऱ्या संस्थेचे वेगवेगळे कार्ड घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक कार्डची किंमतही वेगवेगळी आहे. तसेच नागरिकांना वेगवेगळे कार्ड बाळगावे लागणार आहे.

संस्था - कार्ड - किंमत (रुपयांत)
बेस्ट - चलो कार्ड - १००
एमएमआरसी मेट्रो - मुंबई वन - मोफत
पुणे मेट्रो - एक पुणे - ११८
एसटी - एनसीएमसी - १९९

नागरिकांना रोख पैसे न बाळगता पुणे मेट्रोने प्रवास करता यावा, म्हणून ‘एनसीएमसी’ कार्ड सुरू केले आहे. जोपर्यंत सर्व कार्ड इंटिग्रेशन (एकत्रीकरण) होत नाही, तोपर्यंत मेट्रोचे कार्ड एसटीत किंवा एसटीचे कार्ड मेट्रोत चालणार नाही.
- चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

इतर संस्थांचे ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ एसटीत चालणार आहे. त्यामुळे ‘एनसीएमसी’ कार्ड असणाऱ्यांना वेगळे कार्ड काढण्याची आवश्‍यकता नाही.
- रोहन देसाई, सहायक जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ

PNE26V98888

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT