पिंपरी-चिंचवड

एपीके फाइल पाठवून आर्थिक फसवणूक

CD

पिंपरी : एमएनजीएल गॅसचे बील भरायचे राहिले आहे, असे सांगत एपीके फाइल पाठवून एका नागरिकाच्‍या खात्‍यातील एक लाख १५ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना आकुर्डी येथे घडली. या प्रकरणी एका व्यक्तीने निगडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विकास कुमार नावाच्या व्यक्तीसह इतर अज्ञात आरोपींवर गुन्‍हा दाखल केला आहे. फिर्यादी हे त्यांच्या आकुर्डी येथील कंपनीत काम करीत असताना त्‍यांना आरोपींनी संपर्क साधून तुमचे एमएनजीएल गॅसचे बिल भरायचे राहिले आहे, असे सांगितले. फिर्यादीला बिल अपडेट एपीके फाइल पाठवून त्याद्वारे फिर्यादी यांच्या बँक खात्‍यातून एक लाख १५ हजार रुपयांची रोकड ऑनलाइन काढून घेत फसवणूक केली.

जादा परताव्याच्या आमिषाने ३० लाखांचा गंडा
पिंपरी : स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एकाची ३० लाख ७० हजार ६०६ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्‍यात आली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. या प्रकरणी एका व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अंजली शर्मा व करण भगत नावाच्या व्यक्तींसह इतर अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे मोबाईल पाहत असताना एका व्हॉट्‌सअॅप ग्रुपमध्ये ॲड झाले. आरोपींनी त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर स्‍टॉक मार्केटमध्‍ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. विविध खात्यांमध्ये ३० लाख ७० हजार ६०६ रुपये भरायला लावले. मात्र, नंतर परतावा न देता फिर्यादीची फसवणूक केली.
---

मुंबई-कोकण दुवा आणखी मजबूत होणार! महत्त्वाच्या खाडी पूल प्रकल्पाला गती; आता अंतर कमी अन् वेळही वाचणार, पाहा संपूर्ण आराखडा...

Talathi Office Corruption : तलाठी कार्यालयातील पंटर दहा हजार घेताना जाळ्यात, तासगावमध्ये मोठी कारवाई

सैफ सोबत लग्नानंतर करीना कपूरही ठेवते रोजा? स्वतः सांगितलं सत्य, म्हणाली- मुस्लिम कुटुंबात लग्न झालं तरी...

Latest Marathi News Live Update : पुणेकरांचे आरोग्य धोक्यात, धूळ आणि धूर यामुळे अनेकांना श्वासनाचे आजार

India vs Pakistan सामना १४ जूनला! ICC च्या निर्णयाने सर्वांना झटका; १२ संघांचा समावेश असलेल्या मोठ्या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT