पिंपरी-चिंचवड

कंटेनर अडकून अकरा तास खोळंबा!

CD

पिंपरी, ता. २४ : निगडीहून दापोडीकडे जाणाऱ्या मार्गावर पिंपरीतील ग्रेडसेपरेटरमध्ये (समतल विलगक) मंगळवारी (ता.२४) मोठा कंटेनर अडकला. यामुळे ग्रेडसेपरेटर आणि सेवा रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल अकरा तासांच्या प्रयत्नानंतर हा कंटेनर बाहेर काढण्यात आला. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली. या घटनेमुळे इतर वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
मंगळवारी (ता.२४) पहाटे पाचच्या सुमारास हा कंटेनर पिंपरी, मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समतल विलगक मार्गात अडकला. यामुळे दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. काही वेळाने ‘ग्रेड सेपरेटर’मधील वाहने सेवा रस्त्यावर वळवण्यात आली. त्या मार्गावरही वाहनसंख्या वाढल्याने वाहतूक मंदावली. सकाळची वेळ असल्याने कामगारांची कार्यालयात पोहोचण्यासाठी धडपड सुरू होती. अडकलेला कंटेनर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर चाकांमधील हवा कमी करून क्रेनच्या सहाय्याने खेचून सायंकाळी साडेचारच्या सुमारास कंटेनर बाहेर काढण्यात आला.

नागरिकांना मनस्ताप
सकाळची वेळ असल्याने कामावर, शाळा, कॉलेजमध्ये तसेच व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्वांचीच धावपळ सुरू असते. अशातच अशा प्रकारच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागल्यास मनस्ताप सहन करावा लागतो. मंगळवारी सकाळी मोरवाडीतील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. काही नागरिकांचा वाहतूक पोलिसांशी वादही झाला.

कंटेनर अडकण्याचे प्रकार नेहमीचेच
सुरळीत वाहतुकीसाठी मुंबई-पुणे महामार्गावर निगडी ते दापोडी असा साडेबारा किलोमीटरचा ग्रेडसेपरेटर बनविण्यात आला. यामध्ये काही ठिकाणी पूलही आहेत. या मार्गावरून केवळ साडेचार मीटर उंचीच्या वाहनांनाच परवानगी आहे. यासाठी या मार्गावर ठिकठिकाणी वाहनांच्या उंचीबाबतचा सूचना फलक तसेच हाइट रिस्ट्रिक्टर (उंचीरोधक) खांब उभारणे आवश्यक आहे. मात्र, ग्रेडसेपरेटरमध्ये काही ठिकाणीच सूचना फलक व ‘हाइट रिस्ट्रिक्टर’ दिसून येतात. त्यामुळे साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीची वाहनेदेखील थेट ग्रेडसेपरेटरमध्ये शिरतात. पुलाखालून जाताना अधिकच्या उंचीमुळे मध्येच अडकतात. अशा घटना घडल्यास ग्रेडसेपरेटरमधील वाहतुकीचा खोळंबा होतो. पूर्णपणे वाहतूक बंद करून सेवा रस्त्याने वळवावी लागते. यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीत भर पडते. मेट्रोसह रस्त्याच्या सुरू असलेल्या कामांमुळे ठिकठिकाणी ‘बॅरिकेडिंग’ केलेले असते. यामुळे अनेकदा ‘मर्ज ईन-मर्ज आऊट’चा अंदाज येत नाही. अशातच ‘हाइट रिस्ट्रिक्टर’ही उपलब्ध नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो.

फोटो आयडी - 98524, 98525, 98526, 98527 , 98528, 98529

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT