पिंपरी-चिंचवड

आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यात आमदार गोरखे यांचा सहभाग

CD

पिंपरी, ता. २४ ः महाराष्ट्राच्या प्रशासन, कृषी, पर्यावरण व संसदीय कार्यपद्धती अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्यातील १५ आमदारांनी पाच दिवसांचा लंडन व वेल्स अभ्यास दौरा केला. ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड’ यांच्यातर्फे आयोजित दौऱ्यात जागतिक नेतृत्व, पुराव्यावर आधारित धोरणनिर्मिती, शाश्वत कृषी व्यवस्थापन व संसदीय लोकशाही प्रणाली आदी मुद्द्यांचा समावेश होता. या दौऱ्यात पिंपरी चिंचवडमधील आमदार अमित गोरखे यांचा सहभाग होता.
दौऱ्याबाबत गोरखे म्हणाले, ‘‘पिंपरी चिंचवडसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या औद्योगिक शहरात डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया आणि कार्यक्षम अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक योजनेचा खर्च-लाभ विश्लेषण (कॉस्ट-बेनिफिट अनालिसिस) व परिणाममापन प्रणाली विकसित केल्याशिवाय प्रशासन प्रभावी ठरणार नाही. महापालिकेमध्ये ‘कार्यक्षमता डॅशबोर्ड’, विभागनिहाय मुख्य कार्यक्षमता निर्देशांक आणि नागरिकांना खुली माहिती प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न राहील.’’
लंडनमध्ये महाराष्ट्र मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातही गोरखे यांनी सहभाग घेतला. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचे उपसचिव जार्विस मतिया यांच्या हस्ते गोरखे यांचा गौरव करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक निवासस्थानासही त्यांनी भेट दिली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCच्या ३१ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, विकासकामांसाठी वापरणार; भाजपचा महापौर होताच मोठा निर्णय

Rinku Singh: रिंकू सिंगची वर्ल्ड कप स्पर्धेच्या उर्वरित सामन्यातून माघार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

Investment Scheme: सुरक्षित गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय! पोस्ट ऑफिसची ग्राम प्रिया योजना; दरमहा थोडी गुंतवणूक करा आणि मिळवा लाखांचा फंड

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा वायू गळती

Horscope : उद्या 26 फेब्रुवारी! 'या' 5 राशींसाठी गुडन्यूज; घरी येणार पैसा, आरोग्याची मोठी तक्रार होईल दूर, करिअरला नवी दिशा मिळणार

SCROLL FOR NEXT