पिंपरी, ता. २५ ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेसभवन हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी चौकात मंगळवारी (ता. २४) आंदोलन करण्यात आले. यात अपना वतन संघटनेचे सिद्दिक शेख, जितेंद्र छाबडा, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रवीण कदम, ॲड. अशोक धायगुडे, संदेश पीटर जगताप, समरीन कुरेशी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, मारुती भापकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव अशोक मोरे आणि मानव कांबळे, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शहर अध्यक्ष संजय बारी, मनीषा पवार, शीतल उबाळे उपस्थित होते.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.