वाचक लिहितात
यशवंत नगरचा रस्ते दुरुस्ती करा
तळेगाव दाभाडेमधील यशवंत नगर परिसरात बहुतांश रस्त्याच्या वळणांवरील कडेला खणलेले खड्डे तसेच आहेत. त्यावर टाकलेली बारीक खडी पसरली आहे. काही ठिकाणी रस्ते उखडलेला भाग मध्ये भरला गेला होता. तो परत उखडला गेला आहे. वळणावर वाहने एकमेकांवर आदळण्याचा व त्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो. तेथून पायी चालणाऱ्यांची तर चांगलीच पंचाईत होते. कुठच्या बाजूला जावे तेच समजत नाही. किती तरी ज्येष्ठ नागरिक आपल्या नातवांना घेऊन तेथून जात असतात. त्यांची परिस्थिती फारच गंभीर होते. रात्रीच्या वेळी तर वाहनांचे दिवे प्रखर असल्याने समोरचे दिसतच नाही. सर्व वळणांवरील खड्डे लवकरात लवकर बुजवून रस्ते दुरुस्ती करावी, अशी स्थानिक नागरिकांकडून विनंती आहे.
- प्रकाश वा. दातार, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.