पिंपरी-चिंचवड

शहरात नगररचना विभाग कार्यरत आहे का?

CD

पिंपरी, ता. २६ : उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत आहेच; त्याच वेगाने घरांची मागणीही प्रचंड वाढली आहे. शहराभोवती टोलेजंग उमारती उभारण्यात येत आहेत. शहराचा विस्तार होत असताना नियोजनाचा पुरता अभाव दिसून येत आहे. त्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत असून प्रदूषणाची पातळी वाढली आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्तमालिका सुरू केली आहे. हवेची ढासळलेली गुणवत्ता आणि नियम डावलून फोफावलेली बांधकामांची संख्या पाहता महापालिकेचा नगररचना विभाग कार्यरत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

वाढत्या हवा प्रदूषणावर ‘सकाळ’ने लक्ष वेधल्याबद्दल खूप आभार. पिंपरी चिंचवड शहरात नवीन बांधकामे ज्या संख्येने होत आहेत, ते पाहता नगररचना विभाग कार्यरत आहे का? असा प्रश्न पडतो. महापालिकेकडे असलेल्या क्षमतेनुसार एका ठराविक भागामध्ये किती प्रमाणात रहिवासी इमारती उभ्या राहिल्या पाहिजेत, याचे काही मोजमाप आहे का? त्यानुसार कारवाई केली जाते का? आज एकदम पाच ते सहा इमारती एका सोसायटीत उभ्या राहतात. म्हणजे एक ते दोन हजार लोकांची वस्ती एकदम तयार होते. असे प्रकल्प एकाच भागात जवळजवळ उभे राहत आहे. या सर्वांना महापालिका मुबलक पाणी, वीज, रस्ते, सार्वजनिक सक्षम वाहतूक अशा सुविधा योग्य प्रमाणात देऊ शकत नाही, हे सत्य आहे. या बेसुमार बांधकामांवर मर्यादा गरजेची आहे. कारण, लोकसंख्या हाताळण्याची प्रत्येक शहराची एक क्षमता आहे. हे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत.
- गौरव जोशी, थेरगाव रोड, चिंचवड

प्रत्येक सोसायटीला नवीन परवानगी देताना ‘कमीतकमी ५० झाडे लाऊन टिकवली पाहिजेत’, असा नियम करणे आवश्यक आहे. त्याशिवाय पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देऊ नये. विकासाच्या नावाखाली जी भयंकर वृक्षतोड सुरू आहे आणि नवीन बांधकामे भरमसाठ होत आहेत. वाहन उद्योगही जोरात आहे. वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारे प्रदूषण हेदेखील पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचे एक कारण आहे.
- डॉ. हेमा चंद्रशेखर, अध्यक्षा, ‘निमा’ महिला मंच, पीसीएमसी शाखा

वाहनांतून निघणार धूर, बांधकामांची धूळ, कचरा जाळणे आणि झाडांची कमतरता ही हवा प्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत. प्रदूषणामुळे श्वसनाचे इतर आजार होण्यासह लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासारखे परिणाम दिसतात. स्वच्छ हवा ही ‘लक्झरी’ नाही; तर ती मानवाची मूलभूत गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आज आपण टाकलेले एक छोटे पाऊल उद्याचे स्वच्छ भविष्य घडवू शकते.
- डॉ. शिल्पा स्वार, आयुर्वेद व योग तज्ज्ञ

‘सकाळ’ने हवा प्रदूषणाचा मुद्दा हाती घेतला, त्याबद्दल आभार. जोपर्यंत खरोखर हवेची गुणवत्ता सुधारत नाही तोपर्यंत हा मुद्दा सातत्याने, दमदारपणे आणि दबावाला बळी न पडता लावून धरावा ही विनंती. कंपनीच्या जागा ज्या शेतकऱ्यांच्या होत्या, त्या बिल्डरच्या घशात घालण्यात आल्या. शिवाय ‘एफएसआय’ प्रचंड वाढवला. यात बिल्डर, प्रशासन, राजकीय नेते हे संगनमताने अक्षरशः जनतेला लुटत तर आहेतच; पण जीव घेत आहेत. या प्रदूषणाने जीव जात आहेत, जाणार आहेत. त्यामुळे ताबडतोब सर्व बांधकामे थांबविणे आवश्यक आहे. प्राधान्यक्रमाने विशिष्ट अंतरावरील बांधकामे योग्य ती सर्व काळजी घेऊन सुरू ठेवावीत. अन्यथा भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागेल.
- एक वाचक

रोजच काही ना काही कारणाने फटाके वाजवण्याचे प्रमाण प्रचंड आहे. प्लॅस्टिकसकट कचरा जाळण्याचेही प्रमाण सर्वत्र वाढते आहे. यामुळे हवा विषारी होते आहे. यावर कठोर निर्बंध आणले पाहिजेत. ओल्या कचऱ्याचे प्रचंड ढिगारे सडून घातक मिथेन वायू वातावरणात पसरतो आहे.
- डॉ. स्वाती भालेराव, पिंपरी

वाढती लोकसंख्या, रोजंदारीसाठी बाहेरून येणारे लोंढे, त्यासाठी पुरविल्या जाणाऱ्या जीवनावशक गोष्टी, प्रचंड बांधकामे, घरांच्या वाढलेल्या किमती हे सर्व पाहता त्याला काही तरी काही मर्यादा असाव्यात. औद्योगिकरणाचे झालेले केंद्रीकरण थांबायला हवे. काही तरी सोडल्याशिवाय काही तरी मिळणार नाही हे सत्य स्वीकारावे लागेल.
- बाळासाहेब जगदाळे, पिंपळे सौदागर

हवा प्रदूषणाची समस्या त्यांच्या पातळीवर सोडवण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी शहरातील प्रत्येक व्यक्तीने स्वयंस्फूर्तीने सहभाग घेण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे हवेच्या प्रदूषणाशी लढण्यासाठी व्यायामाद्वारे आपल्या फुफ्फुसांची क्षमता सुधारण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. सुवर्णा पांडोरे, पिंपरी

पुनावळे परिसरात सध्या रस्त्यांची कामे वेगात सुरू आहेत. त्याचबरोबर अनेक बांधकाम प्रकल्प आणि आरएमसी प्लांट मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. त्यामुळे संपूर्ण भाग धुळीच्या विळख्यात सापडला आहे. बांधकाम आणि रस्ते कामांदरम्यान धूळ नियंत्रणासाठी पाण्याची फवारणी करण्यासारख्या योजना केल्या जात नाहीत. परिणामी, हवेत सतत धुळीचे प्रमाण वाढले असून श्वसनाचा त्रास, अ‍ॅलर्जी आणि फुफ्फुसांचे आजार होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेऊन धूळ नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.
- नितेश सरडे, पुनावळे

मी वाकड परिसरात राहण्यास आहे. वाकडमध्ये बरेच आरएमसी प्लांट कार्यरत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण होत असून आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. यावर काहीतरी उपाययोजना करायला हव्यात.
- एक वाचक

हवा प्रदूषणाच्या प्रश्‍नावर वाचा फोडण्याचा ‘सकाळ’ने बातम्यांच्या माध्यमातून सुरू केला आहे, तो कौतुकास्पद आहे. असेच काम पुढे सुरू ठेवा. कारण, प्रदूषण रोखण्यसाठी जागृती होणे गरजेचे आहे.
- मयूर बांदल, पिंपरी


बांधकामाचा परवाना देताना ‘पीएमआरडीए’ने एका फ्लॅटमागे एक झाड आपल्या परिसरामध्ये लावणे बंधनकारक केले होते. तसाच नियम जे बिल्डर अडीचशे, पाचशे, हजार फ्लॅटची स्कीम करतात. त्यांना सुद्धा लागू करणे गरजेचे आहेत. ज्या वाहनांना पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत, ती चालवण्यासाठी आरटीओने बंदी आणावी. महापालिकेने प्रत्येक वर्षी वृक्ष लागवडीची संख्या वाढवली पाहिजे. त्या झाडांना नियमित पाणी मिळते, की नाही याच्याकडे उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वाळू-सिमेंटचे ट्रक लोकवस्तीमधून येऊ नयेत, यासाठी त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी त्यांना मार्ग ठरवून द्यावा.
- सुभाष राणे, पिंपरी

विशालनगर, पिंपळे निलख परिसरांत अनेक बांधकामे सुरू आहेत. आठवड्यातून एक दिवस काम बंद ठेवणे, ठराविक वेळेत काम सुरू-बंद करणे इत्यादी नियम धाब्यावर बसवले जात आहेत. ध्वनी प्रदूषण हा मुद्दादेखील महत्त्वाचा आहेच. नागरी सुरक्षेसाठी महापालिका प्रशासनासह सर्व यंत्रणांनी बांधकामे आणि त्यांच्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण यावर निर्बंध आणावेत.
- भारती आठल्ये, पिंपळे निलख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivshahi Bus: एसटीच्या ‘शिवशाही’ला कायमचा ब्रेक लागणार! आता MSRTC च्या 'या' बसेस रस्त्यावर धावणार; प्रशासनाचा मोठा निर्णय

Who is Auqib Nabi? रणजी स्पर्धेत ५५ विकेट्स घेणारा, वेगाचा नवा बादशाह... दिनेश कार्तिकने केले कौतुक; भारतीय संघात तो हवा...

बिग बॉसची स्पर्धक तन्वी कोलतेला मोठा धक्का, इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब!

Company Bonus Video: पैसेच पैसे! टेबलावर ठेवले २४० कोटी अन् म्हणाला मोजता येतील, तेवढे उचला

T20 WC, WI vs SA: विंडीजने दाखवली ताकद, शेफर्ड - होल्डरची विश्वविक्रमी भागीदारी अन् द. आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य; भारताची धाकधुक वाढली

SCROLL FOR NEXT