पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

गांजा बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक

पिंपरी : काळेवाडी परिसरात विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली.
प्रतीक खैरनार (रा. मुकाईनगर, हिंजवडी), मयूर कपाटे (रा. लिंक रोड, अशोकनगर, पिंपरी) आणि अक्षय मंधान (रा. पियुष पार्क, पिंपरीगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी प्रतीक याच्याकडून चार हजार ६५० रुपयांचा, मयूर याच्याकडून ३० हजार ३०० रुपयांचा तर अक्षय याच्याकडून दोन लाख ३० हजार ४०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.


थेरगावात दोन महिलांवर कोयत्याने वार

पिंपरी : संसार उद्ध्वस्त केल्याच्या गैरसमजातून थेरगाव येथील जगतापनगर परिसरात एका तरुणाने महिलेवर आणि तिला वाचवण्यासाठी आलेल्या तिच्या बहिणीवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.
महिलेने काळेवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी योगेश रणदिवे (रा. जगतापनगर, थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा गैरसमज झाला की, फिर्यादी महिलेमुळे त्याचा संसार मोडला आहे. या रागातून त्याने फिर्यादीच्या डोक्यात आणि हातावर लोखंडी कोयत्याने वार केले. दरम्यान, फिर्यादीची बहीण फिर्यादीला वाचविण्यासाठी आली असता, आरोपीने तिच्यावरही वार करून जखमी केले आणि तेथून पसार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT