पिंपरी, ता. २६ : कंपनीत यंत्राचा सुटा भाग अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना चिखलीतील नवतेज प्रेसिंग अँड इंजिनिअरिंग साने इंडस्ट्रीज कंपनीत घडली. सुनील व्यंकट बडघे (रा. अष्टविनायक चौक, मोरे वस्ती, चिखली) असे या घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंपनी मालक अशोक जगन्नाथ वराडे (रा. संभाजीनगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कंपनीत वाहनांचे सुटे भाग बनवले जातात. हे सुटे भाग बनवताना यंत्राचा भाग अंगावर पडून बडघे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. कामगारांच्या सुरक्षेबाबत योग्य त्या उपाययोजना न केल्याने वराडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.