पिंपरी, ता. २६ : पैशांच्या कारणावरून झालेल्या वादात चाकूने वार करून तरुणाची हत्या करण्यात आली. ही घटना काळेवाडीतील लकी बेकरी चौक येथे घडली.
हाशिम सईद राईन (वय २४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अरबाज सईद राईन (रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सद्दाम मो. मुमताज राईन आणि मो. शरीफ वली खान ऊर्फ जर्सी पठाण (दोघेही रा. कापसे चाळ, विजयनगर, काळेवाडी) यांना अटक केली आहे. फिर्यादी व त्यांचे चुलत भाऊ सर्फराज हे जेवण करून घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. सर्फराज यांच्याकडे सद्दाम याचे पैसे असल्याच्या कारणावरून आरोपींनी वाद घालत धक्काबुकी केली. त्यावेळी फिर्यादी मध्ये पडले असता, त्यांनी फिर्यादीलाही मारहाण केली. दरम्यान, फिर्यादीचे भाऊ हाशिम राईन, मामा उमर व आणखी एकजण भांडण सोडविण्यासाठी आले असता, पठाण याने फिर्यादीच्या डोळ्यांवर वार केला. हाशिम हे फिर्यादीला वाचवण्यासाठी आले असता सुदाम याने त्यांना पकडले; तर पठाण याने छातीत चाकू मारून त्यांना गंभीर जखमी केले. यात त्यांचा मृत्यू झाला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.