पिंपरी-चिंचवड

‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत शहरातील १२१ बालकांचा शोध

CD

पिंपरी, ता. २६ : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून सन २०१८ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अठरा वर्षांखालील २८६ बालके हरवल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. या बालकांचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्यात आले. यापैकी १२१ बालके शोधण्यात पोलिसांना यश आले.
हरवलेल्या १८ वर्षांखालील मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान-१४’ ही विशेष मोहिम राबवण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्येही हा तपास करण्यात आला. या मोहिमेच्या अनुषंगाने सन २०१८ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीतील गुन्ह्यांचा आढावा घेतला असता एकूण २१४ बालके (३० मुले आणि १८४ मुली) हरवल्याची नोंद होती. दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांनी या मोहिमेत ७१ बालकांचा (११ मुले आणि ६० मुली) शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. तसेच मोहिमेच्या प्रत्यक्ष कालावधीत म्हणजेच २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हरवलेल्या ७२ बालकांपैकी ५० बालकांचा (१६ मुले आणि ३४ मुली) शोध घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

SCROLL FOR NEXT