पिंपरी-चिंचवड

मालमत्ता कर अभय योजना राबवा

CD

पिंपरी, ता. २६ ः मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी आणि करदात्यांच्या सोईसाठी मालमत्ता कर अभय योजना प्रभावीपणे राबवावी, असा प्रस्ताव महापौर रवी लांडगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यापुढे ठेवला. त्यावर, ही योजना लवकरच लागू करण्याचे आयुक्तांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, पर्यावरण संरक्षण आणि शहरातील मूलभूत सोयीसुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस व वेळबद्ध कार्यवाही करण्यात यावी. यासाठी महापौर रवी लांडगे आणि महापालिका आयुक्त हर्डीकर यांची बैठक झाली. त्यात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मालमत्ता कर अभय योजनेसह पाणीपुरवठा, नाले सफाई, भटक्या श्वानांचे व्यवस्थापन, भोसरी रुग्णालय नामकरण व इंद्रायणी नदी संवर्धन आदी विविध विषयांवर चर्चा झाली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी बचत उपाययोजना, गळती नियंत्रण, टँकर नियोजन, प्रलंबित व चालू पाणीपुरवठा प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर दिला. पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, गटार दुरुस्ती व जलनिस्सारण व्यवस्थेची पूर्वतयारी काटेकोरपणे पूर्ण करण्यासाठी विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्याचे ठरले.

चर्चेतील महत्त्वाचे विषय
- भोसरीतील नवीन रुग्णालयाचे ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी नवीन भोसरी रुग्णालय’ असे नामकरण करावे
- इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता मोहीम, औद्योगिक सांडपाणी नियंत्रण करणे
- सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बळकटीकरण व शाश्वत संवर्धनासाठी व्यापक कृती आराखडा तयार करणे
- भटक्या श्वानांच्या समस्येवर कायदेशीर चौकटीत सर्वसमावेशक उपाययोजना राबविणे
- भटक्या श्वानांचे लसीकरण, नसबंदी, जनजागृती आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे विशेष गाड्यांचा कालावधी वाढवणार

SCROLL FOR NEXT