अतिक्रमणाविरोधात कायमस्वरूपी तोडगा हवा
‘नव्या पदपथावर लगेच अतिक्रमण; नागरिक त्रस्त’ ही बातमी वाचली. किवळे-निगडी बीआरटी मार्गावर नव्याने पदपथ तयार करण्यात आले असून या ठिकाणी व्यावसायिकांनी टेबल व खुर्च्या मांडून दुकाने थाटली आहेत. ही वस्तुस्थिती आहे. या बातमीने पदपथावरील अतिक्रमणामुळे होणाऱ्या अडचणीबाबत वाचा फोडली आहे. आता लोकनियुक्त शासन आणि प्रशासनही आहे. दोघांनी जनतेच्या संवेदना लक्षात घेऊन पादचारी मार्ग तातडीने मोकळे करण्याची मोहीम हाती घ्यावी. अतिक्रमण विभागाने फक्त कारवाई न करता कायमस्वरूपी तोडगा काढावा. विषय किरकोळ असला तरी खूप महत्त्वाचा आहे. ‘सकाळ’ याबाबत व नागरी समस्यांबाबत वारंवार आवाज उठवत आहे.
- सुरेश लुनावत, किवळे, देहूरस्ता