पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्याला अटक
पिंपरी : घरगुती कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना निगडी ओटास्कीम येथील उरुवेला हाउसिंग सोसायटी येथे घडली. गायत्री राठोड (वय ३७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मनोज राठोड (रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. मनोज आणि गायत्री यांच्यात घरगुती कारणावरून भांडण झाले. या वादातून आरोपीने गायत्री यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर फरशीवर पाडून गळा आवळला. यात गायत्री यांचा मृत्यू झाला.
मद्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण करून लुटले
पिंपरी : मद्यप्राशन आणि सीएनजी भरण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तरुणाने मित्रालाच बेदम मारहाण केली. तसेच त्याचा मोबाइल फोडला, तसेच पैसे पळवले. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर मोशी येथे घडली. या प्रकरणी संदीप गुंजाळ (रा. कर्वे नगर, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल शिंदे (रा. कर्वेनगर, पुणे) याला अटक केली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे हे मित्र असून ते मद्य प्राशनानंतर आरोपीने फिर्यादीकडे पैसे मागितले. मात्र, फिर्यादीने नकार दिल्याने त्याने फिर्यादीचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले. तसेच फिर्यादीला मारहाण करून आठ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
कचऱ्याच्या कारणावरून तीन महिलांना मारहाण
पिंपरी : कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादात शेजाऱ्यांनी महिला आणि तिच्या दोन बहिणींना दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना मोशीतील भारत माता चौकाजवळील नागेश्वर कॉलनी येथे घडली. या प्रकरणात ५५ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुरुनाथ जाधव, एक महिला आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी घरी असताना महिला आरोपी आणि तिचा मुलगा तिथे आले. कचरा टाकण्याच्या कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली.
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.