पिंपरी-चिंचवड

अवघड गणित होणार सोपे

CD

सकाळ विद्या

पिंपरी, ता. २८ : माध्यमिक शिक्षणात गणित विषय कसा आनंददायी होईल, या दृष्टीने ‘सकाळ विद्या’ आणि ‘भांडारकर ॲकॅडमी’ यांच्यातर्फे रविवारी (ता.१५) इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या माध्यमातून गणित विषय सोपा होण्यासह विद्यार्थ्यांमधील गणित विषयाची भीती दूर होणार आहे.

प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहात सकाळी दहा वाजता हे चर्चासत्र विनामूल्य भरविण्यात येणार आहे. चर्चासत्रामध्ये भांडारकर ॲकॅडमीचे संस्थापक संचालक अभिजीत भांडारकर हे मार्गदर्शन करणार आहेत. उच्च शिक्षणातील उत्तुंग भरारीची बिजे ही मुलांच्या माध्यमिक शिक्षणात म्हणजेच आठवी ते दहावीच्या अभ्यासात रुजलेली असतात. बऱ्याचदा गुणवत्ता असूनही केवळ योग्य मार्गदर्शनाचा अभाव, चुकीचे अभ्यासतंत्र यामुळे वर्षभर अभ्यास करूनही विद्यार्थी मागे पडतात. त्यामुळे अभ्यासाचे तंत्र व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. प्रत्येक गोष्टीला सरावाची गरज असते. अगदी खेळही. गणितही त्याला अपवाद नाही. एकदा सूत्रे पाठ झाली आणि गणित सोडवायची पद्धत कळाली की गणित सोपे जाते. गणितातील क्लिष्ट असे हजारापेक्षा जास्त सूत्रे भांडारकर हे यावेळी सांगणार आहे. गणित अवघड वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व मुलांचा सर्वांगीण विकासासाठी हे चर्चासत्र उपयोगी ठरणार आहे.
---------
‘रिदमिक फार्म्युला तंत्रज्ञाना’ची राष्ट्रीय स्तरावर नोंद
तालासुरात गणित शिकविण्याचे अभिनव ‘रिदमिक फार्म्युला तंत्रज्ञान’ अभिजित भांडारकर यांनी आत्मसात केले आहे. त्यामुळे आता इयत्ता आठवी, नववी आणि दहावीचे गणित सोपे झाले आहे. अल्पवधीच हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरले असून गणीत या विषयाची गोडी निर्माण होऊ लागली आहे. रिदमिक फार्म्युला तंत्रज्ञानाची ऑक्टोबर २०२४ मध्ये राष्ट्रीय स्तरावर नोंद झाली आहे.
----------------
चर्चासत्राविषयी...
विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य
कधी : रविवारी, १५ मार्च २०२६
केव्हा : सकाळी १० ते १२.३० वा.
कुठे : ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी प्राधिकरण
वक्ते : अभिजित भांडारकर
अधिक माहितीसाठी संपर्क : ७७०९०९७१११
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT