(एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय)
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम उत्साहात झाले. ‘मराठी भाषा जतन आणि संवर्धन’ विषयावर शशांक मोहिते यांचे व्याख्यान झाले. मराठी भाषा ही समृद्ध जीवनाचा पाया असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांच्या मराठी भाषेतील योगदानाविषयी माहिती दिली. निबंध लेखन स्पर्धेत १२४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तन्वी गोरे (प्रथम), ऋतुजा पहाडे (द्वितीय), नेहा तांडे (तृतीय) यांनी पारितोषिक पटकावले. संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांनी ‘माय मराठी’ ही इतर भाषांची जननी कशी आहे आणि आजच्या युवकांनी मराठी का आत्मसात करावी, याविषयी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. निशिगंधा भालेराव, डॉ. राहुल बाराथे, डॉ. सुनील महाजन, सारिका पडवळ, आदर्श तांबे, रोहिणी पोकळे आणि सुवर्णा सानप यांनी संयोजन केले. उपसंचालिका डॉ. अक्षदा कुलकर्णी, डॉ. मानसी अतिकार, संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांचे मार्गदर्शन लाभले.
‘तंत्रज्ञान’ प्रशिक्षण कार्यशाळा
ईटन रिसर्च लॅब्सच्या सहकार्याने एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथील इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल आणि संशोधन व विकास सेल यांच्यातर्फे ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञान आणि व्यावसायिकीकरणासाठी नवोपक्रम विकास प्रक्रिया’ विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा झाली. नवोपक्रम विकासाची संपूर्ण प्रक्रिया, तंत्रज्ञान व उत्पादन सज्जता स्तर, विकसित तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणासाठी आवश्यक आयएसओ प्रमाणपत्र प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. सचिन वडिखाये (इनोव्हेशन मॅनेजर) यांनी प्रयोगशाळेतील संशोधन उद्योगक्षेत्रात प्रभावीपणे रूपांतरित करण्याच्या पद्धती, तंत्रज्ञान हस्तांतरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी, उद्योग-संस्था सहकार्य याविषयी मार्गदर्शन केले. संचालक डॉ. बी. बी. वाफारे, उपसंचालक डॉ. अक्षदा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. वंदना पगार यांनी समन्वय साधला. डॉ. वैशाली खेरडेकर (अधिष्ठाता, संशोधन व विकास), आयआयसी समन्वयक डॉ. संदीप धवळे यांनी सहकार्य केले.
(00000)
चित्रकला स्पर्धेत सार्थक प्रथम
एमएईईआरचे एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळंदी (देवाची) येथे शिवजयंतीनिमित्त स्केच ड्रॉइंग स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, नेतृत्वगुण आणि सर्जनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी ‘शिवजयंती’ विषयावर विविध चित्र रेखाटली. प्रा. जयवंत भुमकर व प्रा. निकिता देवरे यांनी परीक्षण केले. त्यांनी रेखाटनातील सर्जनशीलता, विषयाची मांडणी, रेषांची अचूकता व कलात्मकता यांचा विचार केला. सार्थक आंबोरे (प्रथम), प्रज्ञा साळवे (द्वितीय), अक्षता कोळी (तृतीय), ऋषिकेश कुंडईकर (उत्तेजनार्थ) यांनी पारितोषिक पटकावले. क्लब समन्वयक निशिगंधा भालेकर व रेणुका कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. स्टुडंट अफेअर्स विभागाचे डॉ. सुनील महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. बी. बी. वाफरे, उपप्राचार्य डॉ. अक्षता कुलकर्णी. डॉ. मानसी आटीतकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
(99999)
--
मराठी भाषा दिन उत्साहात
(इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी)
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंट आकुर्डी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाला. संचालक डॉ. संतोष खलाटे यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व विशद करून मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. प्रा. वृषाली मोरे यांनी ‘मराठी भाषा व संस्कृतीचे नाते’ विषयावरील व्याख्यानात मराठी भाषेचा इतिहास, तिची समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचे महत्त्व सांगितले. काव्यवाचन स्पर्धेत संजीवनी गायकी (प्रथम), ऋतिक कांबळे (द्वितीय), सौरभ गालफडे व स्नेहा वाघमारे (तृतीय) यांनी पारितोषिक पटकावले. संजीवनी गायकी हिने सूत्रसंचालन केले. प्रा. कविता चव्हाण, प्रा. पूजा प्रजापती, प्रा. शारदा पालव व प्रा. सायली शिंदे यांनी संयोजन केले.
(00001)
--
मराठी गीत, हस्ताक्षर स्पर्धा
(मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज)
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांनी मराठी गीत सादर केले. ग्रंथपाल गंगाराम मेंगाळ यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी केंडे यांनी केले. प्राचार्य डॉ. मनोज साठे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. हस्ताक्षर स्पर्धा झाली. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. प्रकाश दीक्षित, प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, शैक्षणिक समन्वयक प्रा. डॉ. प्रसन्न चव्हाण, आयक्युएसी समन्वयक प्रा. धन्वंतरी नरवडे यांनी मार्गदर्शन केले.
उद्योग आणि नावीन्य मार्गदर्शन
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज तर्फे ‘स्टार्टअप अँड इनोव्हेशन’ अंतर्गत मार्गदर्शन शिबिर झाले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची आवड निर्माण करणे व उद्योगासाठीची नवीन संकल्पना रुजावी हा उद्देश होता. प्रा. श्रुतिका खोले यांनी उद्योगधंदा पारंगत होण्यासाठी प्रोत्साहित केले. प्रा. वंशिता रिजवानी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वर्षा खंडागळे यांनी समन्वय साधला.
---
मराठी भाषेचा गौरव उपक्रम
(पीईएस मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, मोशी)
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पीईएस मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी मोशी येथे मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि सांस्कृतिक वारसा गौरव उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेबद्दल अभिमान निर्माण करणे, मराठी भाषा जतन आणि समृद्ध करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रख्यात मराठी साहित्यिकांच्या कार्याचा गौरव करणे या उद्देशाने कार्यक्रम आयोजित केला होता. मराठी साहित्यिक व त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यावर आधारित विविध खेळ आणि वक्तृत्व सादर केले. विद्यार्थ्यांना मराठीत आत्मविश्वासाने आपले विचार मांडण्याची प्रेरणा मिळाली आणि भाषेच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाबद्दल त्यांची जाणीव अधिक दृढ झाली. प्राचार्य डॉ. शशिकांत ढोले, प्रा. डॉ. वृषाली तांबे, प्रा. राहुल चंनशेट्टी, डॉ. राहुल शिवरकर, सारिका आल्हाट आदी उपस्थित होती. डॉ. तांबे यांनी मराठी ही आपली ओळख, संस्कृती आणि ज्ञानाची भाषा असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात मराठीचा अभिमानाने वापर करण्यासाठी प्रेरित केले. श्रुती भागवत (तृतीय वर्ष, फार्मा डी) हिचा काव्य संमेलनात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सत्कार केला. हर्षदा पाडवळ यांनी आभार मानले.
मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, मोशी येथे मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह झाला. एसीएस आय इंडिया कंपनीचे सहकार्य लाभले. फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करिअर संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ड्राईव्हचे आयोजन केले होते. यात १५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली. लेखी परीक्षा, तांत्रिक व वैयक्तिक मुलाखतीद्वारे शैक्षणिक ज्ञान, विषयातील समज, संशोधनक्षमता आणि संवादकौशल्याचे मूल्यमापन केले. ६० विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. राहुल शिवरकर, प्रा. मनीषा शिंदे व प्रा. स्नेहा वाकडे यांनी संपूर्ण भरती प्रक्रियेचे नियोजन, समन्वय व अंमलबजावणी प्रभावीपणे पार पाडली.
नवउद्योजक शिबिर
राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी मोशी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या सहकार्याने नवउद्योजक शिबिर घेतले. एआयसी पिन्नॅकल आंत्रप्रेन्युअरशिप फोरम पुणेचे वरिष्ठ व्यवस्थापक शादाब हुसेन यांनी इनक्युबेशन व अॅक्सेलरेटर ः विद्यार्थी व नवउद्योजकांसाठी संधी’ विषयावर मार्गदर्शन केले. स्टार्टअपसाठी उपलब्ध इन्क्युबेशन सुविधा, अॅक्सेलरेटरची भूमिका, विविध शासकीय व खासगी निधी योजनांची माहिती दिली. स्टायमर टेक्नॉलॉजीज पुणेचे उपाध्यक्ष नीलेश शेळके यांनी उद्योजकता विषयावर बोलताना अनुभवातून व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक गुण, संधी ओळखण्याचे तंत्र व आव्हानांवर मात करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. विद्यार्थी विकास अधिकारी स्नेहा पाटील आणि विद्यार्थी विकास अधिकारी (फार्म. डी) एस. एस. फरांदे यांनी संयोजन केले. श्रुती भगवत, सानिका दाबडे व जान्हवी सावरकर यांनी सूत्रसंचालन केले.
---
वढूमध्ये ग्रामस्वच्छता, जनजागृती
(अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यातर्फे श्रमसंस्कार शिबिर वढू खुर्द येथे झाले. सरपंच महेंद्र खांदवे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. पाणलोट व पडीक क्षेत्र व्यवस्थापनाअंतर्गत डोंगर पायथ्याला समपातळी चर, वनराई बंधारे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, गावात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. इंद्रायणी नदी स्वच्छता, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती व हुंडाबंदीविषयी जनजागृती केली. तुळापूर ते वढू खुर्द पदयात्रा, शिवव्याख्यान, शिवजन्मोत्सव उपक्रम राबवले. अजिंक्य डी. वाय. पाटील समूहाचे उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर व्यक्तिमत्त्व विकास), राष्ट्रीय सेवा योजना पुणे जिल्हा समन्वयक डॉ. नाना शेजवळ (शाश्वत विकासासाठी युवक), प्रा. रोहित गुरव (प्रेम, मैत्री व आई-बाबा), जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर (जलसंवर्धन) यांची व्याख्याने झाली. विभागप्रमुख डॉ. भाग्यश्री ढाकूलकर, डॉ. कांचन वैद्य, डॉ. एस. एम. खैरनार, डॉ. पल्लवी खरात, डॉ. जगन्नाथ गावंडे, डॉ. प्रमोद वढते, डॉ. नीलेश माळी, डॉ. नागेश शेळके, गोरखनाथ देशमुख आदींनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. फारुख सय्यद, संस्थेच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. कमलजित कौर यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे सल्लागार डॉ. सुशांत पाटील व उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर यांनी स्वयंसेवकांचे अभिनंदन केले. एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप घुले, प्रा. श्रद्धा खंदारे, प्रा. अमृता मोरे, विद्यार्थी प्रतिनिधी उत्कर्ष पाटील, अनिकेत गायकवाड, दिनेश नगरे, महेश गिरी, सनी पाटील, आदित्य कोनकेवाढ, प्रथमेश माने आदींनी संयोजन केले.
(99996)
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.