पिंपरी-चिंचवड

प्रयोग, अनुभवांतून उलगडले विज्ञान

CD

पिंपरी, ता. ३ : पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने लहान मुलांसाठी व सर्वसामान्य अभ्यागतांसाठी विविध परस्परसंवादी व सहभागात्मक विज्ञान उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हा उत्सव कल्पकघर, लिडरशीप फॉर इक्विटी फाऊंडेशन तसेच रोबोटेक्स इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. याची सुरुवात ‘वेदर हॅकाथॉन’च्या उद्घाटन सत्राने झाली. शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ व विद्यार्थ्यांसाठी दिवसभर मायक्रो वेदर स्टेशन प्रकल्पावर आधारित वेदर हॅकेथॉन आयोजित करण्यात आला.
‘आयसर’ येथील तज्ज्ञांनी घेतलेल्या विशेष स्टेम हॅकेथॉन व्याख्यानातून सहभागींना मार्गदर्शन पद्धती व हवामान विज्ञान संकल्पनांबाबत प्रेरणादायी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ‘स्टेम’ उपक्रम व सर्जनशील विज्ञान कृतींमध्ये सहभाग नोंदविला. या प्रसंगी संस्थेचे संचालक प्रवीण तुपे, यांच्यासह विद्यार्थी, पालक व सहभागी झाले. विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाची सांगता वेदर हॅकाथॉन व उत्कृष्ट ‘स्टेम’ एकूण ५० मॉडेल सादरीकरणातील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभाने झाली. इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स व कोडिंगवरील विनामूल्य सत्रे आयोजित करण्यात आली. याशिवाय विनामूल्य लिक्विड नायट्रोजन शो, विज्ञान शो आणि मॅजिक शो आयोजित करण्यात आले. धुळे, ठाणे, अकोला, हडपसर, थेरगाव, मोशी, सांगवी, सांगली व परभणी जिल्ह्यांतील विविध शाळांनी सायन्स पार्कला भेट देऊन कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १८.६३ कोटींचे अमली पदार्थ भस्मसात

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

Dry Fruits Price : युद्धाची झळ सुकामेव्याला! इराण-इस्रायल वादामुळे खजूर आणि बदामाचे दर वाढणार

खेळाडूंकडून ५० लाख दंड वसूल काय करताय, आणखी कठोर कारवाई करा! शाहिद आफ्रिदीने PCB ला दिला सल्ला; म्हणाला, दोन वर्षांसाठी...

Latest Marathi News Live Update : धुळे ग्रामस्थांच्या मदतीने 5 दरोडेखोर गजाआड, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT