पिंपरी-चिंचवड

‘जंक फूड’बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

CD

पिंपरी, ता. २३ : शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि संतुलित आहार उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी शहरातील सुमारे ६०० मुख्याध्यापक उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय चट्टे, दत्तात्रेय साळुंखे आणि प्रशासकीय अधिकारी संगीता बांगर यांनी मार्गदर्शन केले. शालेय अन्नविषयक नियमांची अंमलबजावणी तसेच आयुक्तांच्या आदेशानुसार शाळा व्यवस्थापनावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती देण्यात आली.
शाळांमधील उपाहारगृह, मध्यान्ह भोजन पुरवठादार, वसतिगृह आणि स्वयंपाकगृह यांच्याकडे वैध परवाना व नोंदणी असणे आवश्यक आहे. तसेच शाळेच्या परिसरात खाद्यपदार्थांची जाहिरात, विपणन आणि विक्री करण्यास बंदी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अन्न सुरक्षा अधिकारी प्रत्येक शाळेची वर्षातून दोन वेळा तपासणी करणार असून, उपाहारगृह व स्वयंपाकगृहातून वर्षातून एकदा अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT