पिंपरी-चिंचवड

घरफोडी करणारी महिला अटकेत; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

CD

पिंपरी, ता. १० : दिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. तिच्याकडून आठ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. सुमन दत्ता लोंढे (रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. सांगवी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एकचे पथक करीत असताना पोलिसांनी सांगवी ते वारजे माळवाडी परिसरातील दोनशे ते अडीचशे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यामध्ये हा गुन्हा लोंढे हिने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक तपास केला असता तिने दोन घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे सांगवी पोलिस ठाण्यातील गुन्हाही उघडकीस आला. बरेचसे लोक बाहेरगावी जाताना घराच्या बाहेर चावी ठेवून जात असतात हे तिने पाहिलेले होते. त्यानुसार या चावीचा शोध घेऊन या घरफोड्या तिने केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवा, बघतोयस ना? सप्ताहात साडे तीन कोटींचा गैरव्यवहार, किशोर महाराज शिवणीकरांसह तिघांवर गुन्हा

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजित दीपके यांनी सांगितली तारीख, दिला मोठा इशारा

पुणे मिरज मार्गावर २१ दिवसांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले, प्रवाशांचे हाल

"तुमची गावठी मराठी नाही पाहिजे" कुंडली भाग्यच्या सेटवर दिग्दर्शकाने केलेला कमळी फेम अभिनेत्रीचा अपमान

Latest Marathi News Live Update : भारताचा डोंगराएवढा स्कोअर; अफगाणिस्तान ५०८ धावांनी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT