पिंपरी, ता. २२ ः चाकण एमआयडीसी परिसरातील म्हाळुंगे पोलिस स्टेशन ते एंड्युरन्स चौक आणि एचपी चौक हा रस्ता वाहतूक विभागाने एक वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्वावर एकेरी केला होता. उद्देश वाहतूक कोंडी कमी करणे हा असला तरी अद्याप या ठिकाणावरील वाहतूक कोंडी सुटलेली नाही. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयामुळे कामगार आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
निगडी-तळवडेकडून येणाऱ्या सर्व वाहनांना एंड्युरन्स चौकातून एचपी चौकात मोठा वळसा घेऊन मग म्हाळुंगे येथे येऊन कंपनीत जावे लागते. त्यामुळे दररोज वेळ वाया जातो, इंधन खर्च वाढतो आणि उत्पादन क्षमतेवर थेट परिणाम होतो. वाढणारा इंधन खर्च, प्रवासाचा वेळ आणि अपघात यामुळे येथील उद्योग व कामगार वर्ग यांना मोठा फटका बसत आहे. एमआयडीसी प्रशासनाने कॉक्रीट रस्ता बनवला आहे. त्यामुळे आता रस्ता प्रशस्त झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने हा रस्ता तातडीने दुहेरी वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी कामगार व स्थानिकांनी केली आहे.
‘‘मोठा वळसा घ्यावा लागल्यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही वाया जाते. वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे.’’
- सचिन कुडापने, प्रतिनिधी, चाकण औद्योगिक संघटना
‘‘एकेरी असूनही अनेक वाहने विरूद्ध दिशेने येतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, रोज धोकादायक प्रवास करावा लागतो.’’
- कुंदन गाडे, मानव संशाधन विभाग
‘‘रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असून, प्रवास धोकादायक झाला आहे. खड्डे बुजवले तरी दर्जाहीन कामामुळे पुन्हा तेच खड्डे तयार झाले आहेत.’’
- शुभम कर्डीले, प्रवासी
‘‘वाहतूक विभागाच्या या निर्णयामुळे कंपनीतील कामगारांना वेळेवर कंपनीत पोहोचता येत नाही. उत्पादन क्षमतेवर गंभीर परिणाम होत आहे. एमआयडीसी प्रशासनाने तातडीने पुन्हा दुहेरी मार्ग सुरू करावा.’’
- प्रियंका धुमाळ, व्यवस्थापक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.