पिंपरी-चिंचवड

दिव्यांग बांधवांकडून शहरात मतदान जागृती

CD

पिंपरी, ता. ५ : महापालिकेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या सहभागातून मतदान जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘माझं मत, माझा अधिकार’ अशा घोषणांतून दिव्यांग मतदारांनी लोकशाही सशक्ततेचा संदेश दिला. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

निगडी प्राधिकरण येथील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातून सुरू झालेली रॅली बिजलीनगर, वाल्हेकर वाडी, चापेकर चौक मार्गे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पोहोचली. रॅलीदरम्यान नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्यात आली. समारोपावेळी ‘फ्लॅश मॉब’ सादरीकरण झाले. तसेच उपस्थितांना निर्भयपणे, निःपक्षपाती व प्रलोभनमुक्त मतदानाची शपथ देण्यात आली.
सांडभोर यांनी ‘‘प्रत्येक मत मौल्यवान असल्याचे सांगत दिव्यांग बांधवांचा सहभाग प्रेरणादायी आहे,’’ असे नमूद केले. जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी दिव्यांग मतदार इतरांनाही मतदानासाठी प्रेरित करीत असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Viral News: मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही सुट्टी नाकारली! अखेर लोको पायलटने अधिकाऱ्यासमोरच काढली पँट; रेल्वेतील धक्कादायक प्रकार

Arjun Tendulkar Marriage: अर्जुन-सानियाचं लग्न! तेंडुलकर कुटुंब सजलं, मेहंदी-संगीत सोहळ्यासाठी सेलिब्रेटिंचीही हजेरी; Video Viral

SCROLL FOR NEXT