पिंपरी, ता. १३ ः सकाळ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात ‘यिन’च्या नेतृत्व विकास कार्यक्रमार्तंगत घेण्यात येणाऱ्या महाविद्यालयीन निवडणुकांची रणधुमाळी सध्या राज्यभरात सुरू आहे. पिंपरी चिंचवडमधील महाविद्यालयांनीही यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.
शहरातील काही महाविद्यालयांमध्ये बिनविरोध, तर काही महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडणूक पार पडली. शहरातील विविध महाविद्यालयांतील निवड प्रक्रियेत विद्यार्थी उत्स्फूर्तपणे पुढे आले. महाविद्यालयीन निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व तरुणांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. या निवडणुकीत महाविद्यालयीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संघटक अशी निवड झाली. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघटन कौशल्य विकसित करणे हा यामागील उद्देश आहे.
---
यिन निवडणुकीसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया समजते, निर्णयक्षमता वाढते आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन भविष्यात सक्षम नेतृत्व घडण्यास मदत होते.
- डॅा. सोहन चितलांगे, कुलगुरू, आलार्ड विद्यापीठ पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.