पिंपरी-चिंचवड

शरदनगरमध्ये दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा

CD

पिंपरी, ता. २४ : ‘‘पिंपरीगाव परिसरातील शरदनगर गल्ली क्रमांक चारमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. या गढूळ पाण्यामुळे परिसरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे,’’ अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

या परिसरातील मुख्य जलवाहिनीमध्ये सांडपाण्याची वाहिनी (ड्रेनेज लाइन) गळती होऊन पाणी मिसळले असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. हे दूषित पाणी पिल्याने आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी या गंभीर समस्येबाबत महापालिकेच्या संबंधित पाणीपुरवठा विभागाकडे आणि प्रभाग कार्यालयाकडे अनेकदा तोंडी व ऑनलाइन तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा जलवाहिनी दुरुस्ती करण्यात आलेली नाही, असे नागरिकांनी सांगितले.

आम्ही नियमित पाणीपट्टी भरतो, तरीही आम्हाला पिण्यासाठी दूषित. पाणी पुरवले जात आहे. पाण्याला इतकी दुर्गंधी आहे की ते वापरणेही कठीण झाले आहे. महापालिकेने तातडीने जलवाहिनीची तपासणी करून दुरुस्ती करावी.
- नितीन चव्हाण, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission चे नवे शेड्यूल जाहीर! ऑक्टोबरपर्यंत बैठका, अंतिम रिपोर्ट आणि वाढीव पगार कधी?

IND vs SL 2nd Test: अरे, चाललंय तरी काय! यशस्वी, असिथानंतर आणखी एका खेळाडूवर ICC ने केली कारवाई; हे नवीन प्रकरण काय?

Dry Fruits Price: रक्षाबंधन, गणेशोत्सवाआधी खिशाला मोठा फटका! कांदा-साखर कमी होती की काय, आता ड्रायफ्रूट्सही महागले, वाचा नवे दर...

Raksha Bandhan 2026 Gift Ideas: बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणतील ‘या’ ८ गोष्टी; पाहा एका-पेक्षा-एक भन्नाट गिफ्ट आयडियाज

Marathi News Live Updates : सिद्धार्थ आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना ताप

SCROLL FOR NEXT