सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १४ ः मोशी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील गुरुवारी ११ विद्यार्थ्यांना मळमळ, जुलाब, उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दहा विद्यार्थ्यांना उपचारानंतर शनिवारी (ता. १४) सायंकाळी सोडण्यात आले. एका विद्यार्थ्यावर उपचार सुरु आहेत. दूषित पाणी प्यायल्यामुळे त्रास झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
या वसतीगृहात सुमारे २६० विद्यार्थी राहतात. त्रास होऊ लागताच विद्यार्थ्यांनी गृहपाल राजकुमार राक यांच्याकडे धाव घेतली, पण त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. काही विद्यार्थी स्वत: रुग्णालयात जाऊन दाखल झाले. गुरुवारी रात्री नऊ विद्यार्थी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांची प्रकृती खूपच खालावल्यामुळे डॉक्टरांनी तत्काळ सलाईन लावले. शुक्रवारी आणि त्यानंतर शनिवारी आणखी एका विद्यार्थ्याला त्रास होऊ लागला. शनिवारी दाखल करावे लागलेल्या विद्यार्थ्याला डिहायड्रेशनमुळे सलाईन लावण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
--
भोसरी रुग्णालयात तीन दिवसांत ११ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले होते. दहा विद्यार्थ्यांना उपचारानंतर सोडले. एका विद्यार्थ्यावर उपचार सुरु आहेत. विद्यार्थ्यांनी दूषित पाणी प्यायल्यामुळे त्रास झाल्याचे सांगितले होते.
- डॉ. ऋतुजा लोखंडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी
---
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठित केली असून गृहपाल राजकुमार राक यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. वसतीगृहात येणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
- प्रदीप देसाई, प्रकल्प अधिकारी
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.