पिंपरी-चिंचवड

भाईगिरी करीत घरावर विटा मारल्या, महिला जखमी

CD

पिंपरी : चौघांच्या टोळक्याने एका महिलेकडे जबरदस्तीने दोन हजार रुपये मागितले. मात्र, महिलेने पैसे देण्यास नकार दिला असता चौघांनी भाईगिरी करीत महिलेच्या घरावर विटा फेकून खिडक्यांचे नुकसान केले. यात महिला जखमी झाली. ही घटना मोशीतील संजय गांधीनगर येथे घडली. या प्रकरणी २८ वर्षीय तरुणाने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी स्वागत सुभाष गायकवाड, अमोल लोंखडे, अमय पवळे आणि अभय तांगडे (सर्व रा. संजय गांधीनगर, मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादीच्या आईकडे दोन हजार रुपयांची जबरदस्तीने मागणी केली. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांच्या घराच्या खिडकीवर विटा मारल्या. यात खिडकीची काच फुटली. तसेच फिर्यादीच्या आईच्या ओठाला दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी ‘आम्ही या भागाचे भाई आहोत, आम्हाला कोणी काही करू शकत नाही’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.

एजंट असल्याचे सांगत मोटार पळवली
पिंपरी : जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा एजंट असल्याचे सांगून एकाने मोटारीची ट्रायल घेण्याच्या बहाण्याने मोटारच पळवून नेली. हा प्रकार हिंजवडीतील पंचरत्न चौक येथे घडली. या प्रकरणी संतोष बापूराव लष्कर (रा. बकोरी फाटा, वाघोली) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रघुनाथ वसंत देशमुख (रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून आपण जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा एजंट असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या मोटारीचा सहा लाख ४० हजार रुपयांत व्यवहार ठरवला होता. ‘गाडीची स्थिती बघण्यासाठी वाकड पुलापर्यंत एक फेरी मारून येतो आणि लगेच रक्कम देतो,’ असे सांगून आरोपी मोटार घेऊन गेला तो परत आलाच नाही. फिर्यादीने वारंवार मागणी करूनही त्याने गाडी अथवा पैसे देण्यास टाळाटाळ केली.

रस्त्यावर गाडी लावू नको म्हटल्याने तरुणाला बेदम मारहाण
पिंपरी : रस्त्यावर गाडी लावू नका, रस्ता मोकळा ठेवा, असे सांगणाऱ्या तरुणाला एकाने बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना सूस रोड येथे घडली. या प्रकरणी शुभम गजेंद्र कवटेकर (रा. सद्‍गुरू कॉलनी, वाकड) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत प्रभाकर गायकवाड (रा. सूस गाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीने आरोपीला रस्त्यावर गाडी लावू नका, रस्ता मोकळा ठेव, असे सांगितल्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीला हाताने व कोणत्यातरी वस्तूने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

मोहन नगर येथे सिमेंटच्या गट्टूने एकाला मारहाण
पिंपरी : घरातील भांडणाचा आवाज कमी करा, भांडणे करू नका, असे सांगितल्याच्या कारणावरून एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्यांना जखमी केले. ही घटना चिंचवड, मोहन नगर येथे घडली. राहुल टोपा पाटील (वय ४७) असे या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राहुल यांच्या पत्नीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुडडू चौरसीया (रा. मोहन नगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीच्या घरातून भांडणाचा मोठ्याने आवाज येत असल्याने फिर्यादीचे पती राहुल पाटील हे तेथे गेले. ‘तुम्ही आवाज कमी करा, भांडणे करू नका,’ असे त्यांनी सांगितले असता ‘आम्ही आमच्या घरात काहीही करू, तुला काय करायचे आहे,’ असे म्हणत आरोपीने त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर सिमेंटचा गट्टू राहुल यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv : बोलेरोची वॅगनारला मागून धडक, त्यानंतर डिवायडर तोडून होंडा सिटीवर आदळली; तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

रणवीर सिंगचा 'धुरंधर २' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात

Latest Marathi Live Update : Jalna: अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुलासोबत उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली

Water Supply: मिरा-भाईंदरकर पाणीटंचाईमुळे हैराण, पाणीकपात कमी करण्याची महापौरांच्या सूचना

SCROLL FOR NEXT