पिंपरी-चिंचवड

उष्माघातापासून बचावासाठी काळजी घ्या

CD

पिंपरी, ता. १६ ः उन्हाळ्याच्या झळा आता तीव्र झाल्या आहेत. यावर्षी उष्णतेची लाट नेहमीपेक्षा लवकर येण्याचा व दीर्घकाळापर्यंत राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
या पार्श्‍वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.

जास्त धोका कुणाला?

- ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती
- ५ वर्षे वयोगटापर्यंतची मुले, गरोदर माता
- मधुमेह व हृदयविकार असणारी व्यक्ती
- अतिउष्ण वातावरणामध्ये काम करण्याऱ्या व्यक्ती

उष्माघाताची कारणे
- शारीरिक श्रमाची कामे जास्त वेळ करणे,
- कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये कामे करणे
- जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे
- घट्ट कपड्यांचा वापर करणे

लक्षणे
- थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
- भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साह वाटणे, डोके दुखणे, पायात गोळे येणे
- रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थ वाटणे

हे करावे
- उन्हात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे
- उष्णता शोषून घेणारे किंवा भडक रंगाचे कपडे वापरु नयेत
- सैल, पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत
- भरपूर पाणी व द्रव पदार्थांचे सेवन करावे प्यावे
- प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी
- उन्हात काम करताना अधूनमधून सावलीत विश्रांती घ्यावी
- उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, छत्रीचा वापर करावा
- घरातील वातावरण थंड व हवेशीर ठेवावे
- दुपारी १२ ते ३.३० या कालावधीमध्ये उन्हात जाणे टाळावे
-----
इमेज
04251

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

हेल्मेट नसताना दुचाकी भरधाव वेगात पळवली; वाटेतच डंपरची धडक बसली अन्... तरुणाच्या डोक्याची झालेली दशा पाहून नागरिकांचं काळीज चिरलं

Trending News : रात्रभर बाईक चालू ठेवली; घरात विषारी धूर..एकाच कुटुंबात ४ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू, राज्यभर खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

SCROLL FOR NEXT