पिंपरी, ता. १६ ः शहरातील विविध विकासकामांसह पाणीपुरवठा, विद्युत देखभाल, सीसीटीव्ही यंत्रणांची दुरुस्ती यांसह विविध विभागांशी संबंधित विषयांना येणाऱ्या खर्चास महापालिका स्थायी समिती सभेने मान्यता दिली.
अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे होते. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर आदी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, महापालिकेच्या शाळा, प्रशासकीय इमारती, विविध प्रभागांतील सीसीटीव्ही यंत्रणेची वार्षिक देखभाल- दुरुस्ती कामांसाठीच्या निविदांना आणि पाणीपुरवठा यंत्रणा, पंपहाऊस, ट्रान्सफॉर्मर व विद्युत यंत्रणांशी संबंधित विविध कामांसाठीचा खर्च; शाळा व दवाखान्यांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यासाठीच्या कामास मुदतवाढ दिली. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार फरक रकमेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी महापालिकेच्या वाट्याचा निधी देणे आदी विषयांना मंजुरी दिली.
सभा अधिकृत की अनधिकृत
महापालिका स्थायी समितीची अर्थसंकल्पीय विशेष सभा सोमवारी (ता. १६) आयोजित केली होती. मात्र, त्यात साप्ताहिक बैठकीसह गेल्या बुधवारच्या (ता. ११) सभेतील तहकूब विषयही सभेत ठेवण्यात आले. साप्ताहिक बैठकीतील काही विषयांसह तहकूब दोन्ही विषय मंजूर केले. वास्तविक, स्थायीची नियमित सभा प्रत्येक सप्ताहात बुधवारी असते. या सप्ताहातील सभा बुधवारी (ता. १८) होणे अपेक्षित होते. त्यामुळे सोमवारी झालेली नियमित व तहकूब सभा अधिकृत की अनधिकृत अशी चर्चा महापालिकेत रंगली. त्यावर नगरसचिव मुकेश कोळप म्हणाले, ‘‘आवश्यक असेल तेव्हा स्थायी समिती अध्यक्ष सभा बोलवू शकतात. त्यांनी सोमवारी सभा घेण्याबाबत पत्र दिले होते. त्यानुसार सभा झाली आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.