पिंपरी, ता. १७ : प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त (टीबी) भारत अभियान अंतर्गत ‘निक्षय मित्र’ उपक्रमाच्याद्वारे शहरातील १११ क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम आकुर्डी रुग्णालय व यमुनानगर रुग्णालयात राबविण्यात आला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, यमुनानगर रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र मंडपे, शहर क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे कर्मचारी गोपाळ कांबळे, चंद्रशेखर सरवदे, अनुराधा चव्हाण आदी देखील उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. गोविंदा नरके, डॉ. हरिदास शेंडे, डॉ. धीरज तायडे, डॉ. विद्याधर फल्ले यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य केले. रोहित देवकर यांनी आयोजन केले. शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर यांनी नागरिक, सामाजिक संस्था, उद्योग आणि स्वयंसेवी संघटनांनी ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढे येत क्षयरुग्णांना सहाय्य करण्याचे आवाहन केले. समाजाच्या सक्रिय सहभागातून क्षयरोगमुक्त भारत हे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
क्षयरुग्णांसाठी औषधोपचारांसोबत योग्य पोषण आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. ‘निक्षय मित्र’ उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संस्था व नागरिक पुढे येत असल्याने क्षयरुग्णांना आवश्यक पोषण मिळण्यास मदत होत आहे. समाजाच्या सहकार्यामुळे रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास आणि क्षयरोगमुक्त भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यास निश्चितच मदत होईल.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.