पिंपरी-चिंचवड

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटांचा सन्मान

CD

पिंपरी, ता. २२ ः विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला बचत गटांचा महापालिकेकडून नुकताच सन्मान करण्यात आला. यावेळी विविध खेळांचा आनंदही महिलांनी लुटला. महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी गीतगायन आणि विविध पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण केले.

महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित कार्यक्रमाचे उद्‍घाटन उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते झाले. माजी आमदार अश्विनी जगताप, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, डाॅ. श्रद्धा लांडगे, प्रिया बनसोडे आदी उपस्थित होते. महापालिका उपायुक्त ममता शिंदे यांनी समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती संगणकीय सादरीकरणातून दिली. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. समाज विकास अधिकारी संतोषी चोरगे यांनी आभार मानले.

महिला पदाधिकारी म्हणाल्या...
शर्मिला बाबर (उपमहापौर)ः समाजात महिलांचे योगदान मोठे आहे. प्रत्येक महिला सक्षम होण्यासाठी विविध उपक्रम राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी समाज विकास विभाग सक्षमपणे काम करीत आहे.
अश्विनी जगताप (माजी आमदार) ः महिलांचा विकास झाला, तरच समाजाचा विकास शक्य होईल. प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम व्हावे. निरोगी रहा, आनंदी रहा, हसत रहा.
राणी पठारे (सभापती, महिला व बालकल्याण समिती) ः बसस्थानके, बाजारपेठा, मंडई, मार्केट, गर्दीच्या ठिकाणी महिला व दिव्यांगांसाठी सर्व सुविधायुक्त आधुनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार.

सन्मानार्थी महिला बचतगट
निसर्ग, स्वामी समर्थ, नवक्षितिज, गृहिणी, अस्तित्व, श्री तुळजाभवानी, कृष्णा, रायगड, राजमाता, आराध्या, दत्तकृपा, मैत्री दिव्यांग, क्रांतिज्योती, विजयालक्ष्मी, समिता, दिव्यज्योती, मेरूशिखर.

सन्मानार्थी बचतगट फेडरेशन
संजीवनी स्वयंरोजगार, उड्डाण स्वयंरोजगार, आरंभ स्वयंरोजगार, झेप स्वयंरोजगार, एकता स्वयंरोजगार, गरुडझेप स्वयंरोजगार, अल्फा स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Politics: मोठा यू-टर्न! आधी 'त्या' अटींनी वाढवला तिढा; आता VCK कडून TVK ला बिनशर्त पाठिंबा, तमिळनाडूत राजकीय नाट्य

जिंकलंस पोरा...! साताऱ्याच्या साहिल जाधवने Archery World Cup मध्ये जिंकलं पदक; आईने स्वतःचे दागिने विकून घेऊन दिलेला धनुष्य-बाण

Valley Beauty : जिथे भारताची सुरुवात होते 'त्या' व्हॅलीत राहतो सर्वांत सुंदर समुदाय; तिथल्या देखण्या महिलांपुढे हिरोईनसुद्धा फेल

OMG: रोहित शर्मा पाकिस्तानचा कसोटी कॅप्टन, शुभमन गिल संघात? BAN vs PAK सामन्यात मोठी चूक, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा राडा

Paithan Water Crisis: धरण उशाला कोरड घशाला..! पैठण तालुक्यातील अठ्ठावीस हजार नागरिकांची तहान भागवण्यासाठी सोळा टँकर

SCROLL FOR NEXT