पिंपरी, ता. १७ : बनावट कागदपत्रांद्वारे जमीन गहाण ठेवून कर्ज काढून बँकेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला. हिंजवडीतील कॅनरा बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला. याप्रकरणी अजय शंकर म्हसकर (रा. मगरपट्टा रस्ता, हडपसर) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विक्रमसिंग महादेव इंगळे, कैलास मारुतराव गायकवाड, प्रसाद गोविंद हजारे व प्रदीप बाळकृष्ण म्हस्कर यांच्यावर गुन्हा दाखल केला.
फिर्यादीच्या मालकीच्या मिळकतीबाबत म्हस्करला विशेष कुलमुखत्यारपत्र मिळाले होते. आरोपींनी काही जणांशी हातमिळवणी करून खोट्या सह्या व कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे बनावट गहाण दस्त तयार करून बँकेकडून सुमारे ५ कोटी ७४ लाख रुपयांचे कर्ज घेतले. परस्पर केवायसी कागदपत्रांवर खोट्या सह्या करून त्यांनी फिर्यादीचे बचत खाते उघडले व गहाण दस्त वापरून फसवणूक केली.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.