पिंपरी-चिंचवड

आणखी सव्वादहा हजार नवी वाहने रस्त्यावर

CD

पिंपरी, ता. १९ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पिंपरी चिंचवडकरांनी वाहन खरेदीला पसंती दिली आहे. या वर्षी शहरात नव्याने दहा हजार २२१ वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच पाच हजार ८०५ दुचाकींची नोंद आहे.

गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा आणि दिवाळी पाडव्याला (अर्धा मुहूर्त) नवे वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची पसंती असते. हा मुहूर्त साधत अनेकजण घर, सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी करतात. यासाठी नागरिक आधीपासूनच बुकिंग करतात. यंदा ५ ते १९ मार्च या १५ दिवसांत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात १० हजार २२१ वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये दुचाकींपाठोपाठ तीन हजार ८१ कारची संख्या आहे. वाहन विक्रेत्यांकडून हेल्मेट, अ‍ॅक्सेसरिज मोफत देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सरासरी सहा ते सात हजार वाहनांची नोंद होते. यंदाही दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरम्यान, गतवर्षी १७ ते ३० मार्च या पंधरा दिवसांत ११ हजार ९४७ वाहनांची नोंद झाली होती. त्यामुळे यंदा गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर वाहन खरेदी घटल्याचे दिसून येत आहे.

वाहनांचा प्रकार आणि वर्षनिहाय खरेदी
वाहन - २०२५ - २०२६
दुचाकी - ६,४४५ - ५,८०५
कार - ४,०१७ - ३,०८१
तीनचाकी - ३३० - ३२९
हलकी मालवाहतूक वाहने - ४११ - ३८७

(माहिती स्रोत : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vehicle Green Tax: महाराष्ट्रात वाहनधारकांना मोठा धक्का! वाहनांवर ग्रीन टॅक्स वाढणार; नवीन कर रचना किती? जाणून घ्या...

Akola Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांना फटका

Nanded News : अर्धापूरात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी, टरबूज, गहू, आंबा पिकांचे मोठे नुकसान

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

SCROLL FOR NEXT