पिंपरी-चिंचवड

घोरावडेश्वर, तळेगाव उद्यानात वृक्षलागवड करण्याचा संकल्प

CD

सोमाटणे, ता. २० ः वनविभागाने घोरावडेश्वर डोंगर व तळेगाव उद्यान सामाजिक संस्थांच्या मदतीने १२ हजार वृक्षांची लागवड करून हरित करण्याचा संकल्प सोडला आहे.
या डोंगरावर भाविक, पर्यटक व ट्रेकरची मोठी वर्दळ असते. दर शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी मंदिर परिसराला भेट देणाऱ्यांची संख्या वाढते. त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या, शुद्ध हवेतील पर्यटनाचा आनंद घेता यावा हा यामागील उद्देश आहे. डोंगराच्या उभ्या चढणीवर तसेच मंदिराच्या बाजूला असलेल्या वृक्षांची संख्या कमी झाली आहे. ती पुर्ववत करण्याचा निर्धार वनविभागाने केला आहे. येत्या पावसाळ्यात सामाजिक संस्था, संघटनांची मदत घेऊन वृक्ष लागवड व जोपासनेचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल.

वणवा पेटवल्यास कारवाई
दरम्यान, शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले, वडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांनी सांगितले की, वणव्यामुळे जंगलाचे नुकसान होते. त्यामुळे जंगल वाचवण्यासाठी वणवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी वनविभाग दक्ष झाला आहे. आरोपी सापडल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा आमचा निर्धार आहे. नागरिकांनीही जंगलसंपत्ती वाचवण्यासाठी सहकार्य करावे. वणवा पेटलेला दिसताच वनविभागाशी संपर्क साधावा.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: ठाण्यात तीन दिवस वाहतुकीत मोठे बदल, 'हे' वर्दळीचे मार्ग बंद; पर्यायी मार्ग काय असतील?

Murud Beach Tourist : मुरूड-जंजिऱ्यात पर्यटकांची गर्दी! उन्हाळी सुट्टीत समुद्रकिनारे हाऊसफुल्ल, ऐतिहासिक किल्ल्यांच्या भेटीसाठी तुफान गर्दी

Success Numerology : स्वभावाने खूपच घाबरट असतात 'या' 2 मुलांकाचे लोक; अपयशाच्या भीतीने गमावतात मोठी संधी, नंतर उरतो पश्चाताप

स्वार्थी आणि सूडबुद्धीच्या भूमिकेत उषा नाईक; स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकेत रंगणार नवा ड्रामा

Nashik Conversion Case : 20 पोलिसांकडून रेकी अन् 'त्या' फ्लॅटवर छापा; धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार निदा खानचे राजकीय कनेक्शन उघड, MIM नगरसेवकानं दिला होता निदाला आश्रय?

SCROLL FOR NEXT