पिंपरी-चिंचवड

‘आरटीओ’मध्ये सव्वालाख आरसी बुक पडून

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २१ ः पोस्टातून माघारी आलेली सुमारे सव्वालाखांपेक्षा जास्त वाहन नोंदणी प्रमाणपत्रे (आरसी बुक) पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) पडून आहेत. संबंधित वाहन चालकांनी ३० दिवसांत ती घेऊन जावीत, असे आवाहन ‘आरटीओ’ने केले आहे. अन्यथा ३० एप्रिलनंतर राहिलेली सर्व आरसी बुक निर्लेखन (रद्द) करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले.
पूर्वी वाहन खरेदी केल्यानंतर त्या विक्रेत्याकडेच (डिलर्स) आरसी बुक मिळत असे. २००६ पासून परिवहन विभागाने कागदी आरसी बुक व वाहन परवाना देणे बंद केले. त्या जागी स्मार्ट कार्ड आले. स्मार्ट कार्डचे प्रिंटिंग त्या-त्या प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करून ते पोस्टामार्फत घरी पाठवले जात होते. २०२३ पासून छपाईच्या कामाचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय झाला.
महाराष्ट्रातील मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे छपाई सुरू झाली. पिंपरी चिंचवड आरटीओअंतर्गत येणारे आरसी स्मार्ट कार्ड छत्रपती संभाजीनगर येथे छपाई होऊन चिंचवड पोस्ट कार्यालयात येते. तेथून शहरातील विविध पोस्टांत वितरित केले जाते. त्यानंतर पोस्टमन नागरिकांच्या घरी जाऊन ते देतो. पत्ता चुकीचा, अर्धवट असल्याने, घर बंद असल्यामुळे पोस्टमन ते परत घेऊन जातात. तेथून ते आरटीओ कार्यालयात माघारी पाठवले जातात.
जानेवारी २०११ पासून मे २०२४ पर्यंत सुमारे दोन लाख आरसी पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात परत आले आहेत. त्यापैकी केवळ ६० ते ७० हजारच आरसी आरटीओ कार्यालयातून वितरित करण्यात आली आहेत. अनेक वर्षे आरसी बुक पडून असल्यामुळे प्रशासनाने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. ३० एप्रिलपर्यंत आरसी बुक घेऊन गेले नाही तर ते रद्द करण्यात येतील, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT