पिंपरी-चिंचवड

भाजयुमो कार्यकर्त्यांमुळे विशेष युवक सापडला

CD

पिंपरी, ता. २१ : ठाणे येथून बेपत्ता झालेला विशेष युवक भारतीय जनता युवा मोर्चाच्या पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे सापडला. १६ दिवसांनी त्याची कुटुंबीयांशी भेट झाली.
हा युवक दोन मार्चला ठाण्यातून बेपत्ता झाला होता. कुटुंब त्याचा शोध घेत होते. पिंपरी चिंचवडमधील मोहननगर परिसरात भाजयुमोचे पिंपरी चिंचवड मंडल अध्यक्ष विवेक बारोट आणि त्यांच्या मित्रांना हा युवक आढळला. त्याला बोलता येत नसल्याने ओळख पटविणे कठीण होते. बारोट यांनी पोलिसांच्या मदतीने त्याला ‘स्पेशल चाइल्ड केअर होम’मध्ये दाखल केले. त्याचे छायाचित्र आणि चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आल. दरम्यान, १८ मार्चला रात्री नऊ वाजता बारोट यांना एका व्यक्तीचा फोन आला. आपण युवकाचा भाऊ असल्याचे त्याने सांगितले. ओळख पटल्यानंतर त्या युवकाचे कुटुंबीय तात्काळ ठाण्याहून पिंपरी चिंचवडला दाखल झाले. आपल्या मुलाला पाहून पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राजा शिवाजी' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पाचव्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

Satej Patil Amal Mahadik Meet : अमल महाडिक मला वारंवार भेटतात पण, मुश्रीफ भेटत नाहीत; सतेज पाटलांनी गोकुळ, केडीसीसीतील इनसाईड स्टोरीच सांगितली

West Bengal election: भाजपने संधी दिली अन् भांडी घासणारी महिला झाली आमदार; कलिता मांझींचा थक्क करणारा प्रवास!

WhatsApp गुपचुप हटवत आहे सगळ्यांचे आवडते फीचर! तुम्हाला कळणारही नाही अन् बदलून जाईल तुमचे ॲप

ऋतुराजचा विक्रम धोक्यात? Sanju Samson ने एकाच हंगामात दोनदा केला 'हा' पराक्रम; दिल्लीच्या गोलंदाजांचा उडवला थरकाप

SCROLL FOR NEXT