

SANJU SAMSON CREATES HISTORY
esakal
SANJU SAMSON CREATES HISTORY: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा ४८ वा सामना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स(CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स(DC) यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळला गेला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने ८ गडी राखून आपल्या नावावर केला. चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा लयीत आली आहे आणि संघ आता या हंगामात चांगली गती पकडत आहे. या हंगामात आतापर्यंत १० सामन्यांमध्ये चेन्नईने ५ सामन्यात विजय मिळवले आहे तर ५ सामने गमावले आहेत. सध्या गुणतालिकेत ते १२ गुणांसह सहाव्या स्थानावर आहेत. काल झालेल्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.