पिंपरी-चिंचवड

‘चिमणी वाचवू या’ स्पर्धेत आठवले, चौधरी प्रथम

CD

पिंपरी, ता. २३ ः पक्षी आणि निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत ‘अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्ट’ने जागतिक चिमणी दिनानिमित्त ‘चला चिऊ वाचवू अभियान’ राबविले. त्याअंतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत आयोजित कथा स्पर्धेत अनुक्रमे स्वाती आठवले व मीना करंजकर (ज्‍येष्ठ नागरिक विभागून मराठी), राजेश चौधरी व रागेश्री कुलकर्णी (१९ ते ५९ वयोगट विभागून मराठी), श्वेता सरवटे (हिंदी) आणि आदित्य देव (इंग्रजी) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि कल्पकघर आयसर यांच्या सहयोगाने आयोजित स्पर्धांचे पारितोषिक वितरण सायन्स पार्क सभागृहात झाले. पक्षी अभ्यासक पीयूष सेकसरिया यांचे ‘पक्षी खिडक्यांवर का धडकतात?’ विषयावर व्याख्यान झाले. त्यांच्यासह सायन्स पार्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपारिया, मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार कासार आणि ‘अलाईव्ह’चे संस्थापक अध्यक्ष उमेश वाघेला यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. स्वानंद केसरी आणि चैतन्य राजर्षी यांनी सूत्रसंचालन केले. अलाईव्हचे विश्वस्त राजेंद्र कांबळे आणि डॉ. भालचंद्र पूजारी यांनी संयोजन केले.

विविध स्पर्धांमधील विजेते
रांगोळी ः स्मिता पगडे, उज्ज्वला जेजुरीकर, सान्वी काळे; काव्य ः स्वाती आठवले, पूनम सिंग, आदिती आठवले, जल्पा दवे; कथा ः राजेश चौधरी व रागेश्री कुलकर्णी, अभिजित कोळपे व विक्रम गावंडे, पीतांबर लोहार, प्रशांत पाटील; चित्रकला ः हेमा धोत्रे, सुधीर कुंभार, वरद गावंड, रिहान साळवे, केतकी काशीद.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडणार, १३५ डॉलरवर पोहोचण्याची भीती; महागाई वाढणार?

PM Modi speech Lok Sabha : होर्मुझमध्ये अडथळा कधीच...; लोकसभेत मोदींनी दिला स्पष्ट इशारा

Dhule Municipal Corporation : धुळे महापालिकेत लोकशाही आली, पण सत्ता अद्याप लांबच! दोन महिने उलटले तरी समित्यांचा पत्ता नाही

Latest Marathi News Live Update : सलग पाचव्या दिवशी SIT कडून गोपनीय ठिकाणी खरातची चौकशी सुरू

IND vs AUS Test: भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेचा थरार, कांगारूंचा संघ वर्षभरात २० सामने खेळणार; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT