पिंपरी, ता.२३ ः हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांना व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा अतिरिक्त पुरवठा अद्याप होत नसल्याने हॉटेल्स, रेस्टॉरंटस चालकांमध्ये नाराजी आहे. शेकडो हॉटेल व्यावसायिकांना सिलिंडर मिळणे अजूनही दुरापास्त झाले आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक आणि सरकारी अनुदानित भोजनालये यांना व्यावसायिक एलपीजीचा अतिरिक्त २० टक्के गॅस पुरवठा करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश हॉटेल चालकांना सिलिंडर मिळत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल चालकांना मोठा फटका बसला आहे. व्यावसायिक गॅस न मिळाल्याने हॉटेल व्यवसाय अडचणीत आले आहेत. काही ठिकाणी चूल पेटवण्याची वेळ आली. शहरातील ९० टक्के हॉटेल्स आणि उपाहारगृहे बंद करण्यात झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हॉटेल आणि उपाहारगृहांना अतिरिक्त २० टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीमंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती. पण, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे.
‘‘यापूर्वी दिवसाला एका हॉटेलसाठी ३ गॅस सिलिंडरचा वापर होत होता. आता ३ गॅस सिलिंडर मिळणे अवघड झाले आहे. सध्या एकच सिलिंडर मिळत आहे. व्यावसायिक एलपीजीचा अतिरिक्त २० टक्के गॅस पुरवठा करण्याची प्रस्तुत निर्णयामुळे हॉटेल व अन्नपदार्थ व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल. पण, प्रत्यक्षात गॅस मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. ’’
- सुमीत बाबर, हॉटेल व्यावसायिक, वाकड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.