पिंपरी, ता. २३ ः शहीद दिनानिमित्त थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना महापालिकेतर्फे अभिवादन केले. त्यांच्या प्रतिमांना महापौर रवी लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून केले. उपमहापौर शर्मिला बाबर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. तसेच शहीद भगतसिंग यांच्या दापोडीतील पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, नगरसेवक राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे, प्रतीक्षा लांघी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.