पिंपरी-चिंचवड

पिंपरीतील गॅस एजन्सीवर अखेर कारवाई

CD

सकाळ इम्पॅक्ट


पिंपरी, ता. २५ ः वेळेवर गॅस वितरीत न करणे आणि कार्यालय बंद ठेवून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या पिंपरीतील अनुसया गॅस वितरण एजन्सीवर अखेर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) कंपनीने कारवाईचा बडगा उगारला. एजन्सीकडील सुमारे दीड हजार ग्राहक निगडीतील गॅस वितरण कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना तूर्तास दिलासा मिळणार आहे.
याबाबत ‘सकाळ’ने बुधवारी (ता. २५) ‘गॅस एजन्सी बंद, फोन नॉट रिचेबल !’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली. शहरातील काही गॅस वितरण कार्यालयांकडे गॅस बुकिंग केला तरी २५-२५ दिवस गॅस सिलिंडर नागरिकांना मिळत नव्हते. याबाबत संबंधित गॅस वितरकाच्या कार्यालयात फोन केला, तर ते फोन उचलत नाही किंवा त्यांचाही फोन बंद असतो. काही गॅस वितरण कार्यालये, तर गेले अनेक दिवसांपासून बंद आहेत. गॅस सिलिंडरसाठी नागरिक दररोज वितरण कार्यालयात हेलपाटे मारत होते. मात्र, काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिक हतबल झाले होते. पिंपरीतील अनुसया आणि रतन गॅस वितरण एजन्सीबाबत नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे केल्या होत्या. यानंतर पुरवठा विभागाने संबंधित कंपन्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना गॅस वितरण एजन्सीबाबत अहवाल पाठवला. त्यानंतर बीपीसीएल कंपनीने कारवाई केली. अनुसया गॅस वितरण एजन्सीकडील सुमारे दीड हजार ग्राहक जे.के गॅस वितरण कार्यालयाकडे हस्तांतरित केले असून त्यांना गॅस वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना संबंधित एजन्सीमार्फत गॅस वितरण होणार आहेत.

अनुसया गॅस वितरण कार्यालयातील ग्राहकांचे जे.के. वितरण कार्यालयाकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन दिवसात गॅस वितरण सुरळीत होईल.
- डॉ. विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 चे सामने कधी आणि कुठे पाहता येणार LIVE? टाइमिंगपासून ते स्ट्रीमिंगपर्यंत... जाणून घ्या चॅनेल आणि OTT डिटेल्स

सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल; राहुल गांधींचा केरळ दौरा रद्द

Latest Marathi News Live Update : भोंदू खरातला ट्रम्पचा एडव्हायझर नेमला असता- देवेंद्र फडणवीस

Esakal No. 1 Marathi News : मराठी डिजिटलमध्ये eSakal चा दबदबा; कॉमस्कोरमध्ये नंबर 1

Virar News : गॅस टंचाईवर मात करत कळंब हॉटेल चालकाने बनवली टाकाऊ इंजिन ऑईलवर चालणारी शेगडी

SCROLL FOR NEXT