पिंपरी-चिंचवड

बाजारपेठांत भगवे झेंडे, टोप्या, शाली विक्रीस

CD

पिंपरी, ता.२५ ः श्रीराम नवमीच्या पार्श्‍वभूमीवर श्रीराम यांच्या प्रतिमा असलेले टी-शर्ट, टोप्या, शाल, भगवे झेंडे अशा विविध वस्तूंनी बाजारपेठा फुललेल्या दिसत आहेत. घराघरांत पूजेसाठी मूर्ती, आकर्षक सजावट साहित्‍य उपलब्ध आहे. लहान मुलांचे ‘रामायण प्रेरित’ फोटोशूट करण्यासाठी पालकांकडून वेशभूषा खरेदीला पसंती दिली जात आहे.
शहरासह उपनगरांतील बाजारात श्रीराम नवमीनिमित्त विविध वस्तू दाखल झाल्या आहेत. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत श्रीराम यांची प्रतिमा असलेले टी-शर्ट, टोप्या, शाल, मफलर उपलब्ध झाल्या आहेत. उपनगरांत श्रीराम नवमीच्या दिवशी भव्य मिरवणुका काढल्या जातात. मिरवणुकीसाठी जय श्रीराम लिहिलेले विविध आकारांचे भगवे झेंडे, केशरी, पिवळे झेंडे (राम ध्वज), रामायणाच्या दृश्यांचे पोस्टर्स आणि बॅनर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. या पार्श्‍वभूमीवर या वस्तूंना बाजारात मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारात श्रीराम यांची प्रतिमा असलेल्या टी-शर्टची विक्री २०० ते ४०० रुपयांपर्यंत केली जात आहे. तर, टोपी १०० ते १५० रुपयांपर्यंत आणि शाल २०० रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली. यामध्ये सर्वाधिक मागणी ही लहान मुलांच्या टी-शर्ट साठी आहे.
रामायण प्रेरीत फोटोशूटसाठी राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वेशभूषा खरेदी करण्यासाठी पालकांची बाजारात गर्दी होत आहे. धनुष्य-बाण आणि गदा यांसारखे साहित्य लहान मुलांसाठी उपलब्ध आहेत. शहरांमधील बाजारपेठ रामभक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहे.


धूप, पूजेची ताटे
श्रीराम प्रतिमा, आकर्षक पाळणे, सुगंधी अगरबत्त्या, धूप आणि पूजेची ताटे बाजारात आली आहे. बाजारपेठांमध्ये प्रभू रामचंद्रांची मूर्ती आणि प्रतिमा, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची मूर्ती किंवा फोटो, रामरक्षा स्तोत्र पुस्तके, रामायण ग्रंथ, आणि शोभेच्या वस्तूंची मोठी रेलचेल आहे. उत्सवासाठी पिवळे वस्त्र, आणि आरास करण्यासाठी लागणारे साहित्य, तसेच विशेष प्रसाद (सुंठवडा, पंजिरी) खरेदीसाठी गर्दी होत आहे.

साहित्यांचे दर
- बॅच १२० रुपये डझन
- झेंडे ३० ते १०००रुपये
- कापडी फलक (५बाय ७ फूट) - ५०० रुपये
- मफलर १२ ते १०० रुपये
- दागिने- ५०० रुपये
- कपडे ३५० ते ४५० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

Mhada Lottery: लॉटरीशिवाय घरांचे स्वप्न साकार! प्रथम येणाऱ्यास प्राधान्य; २० दिवसांत ६४ घरांची विक्री

Mangalwedha News: अवकाळीने द्राक्ष, डाळिंब मातीमोल, तरीही प्रशासनाचा 'निल' अहवाल; शेतकरी संघटना आक्रमक

IPL 2026 चे सामने कधी आणि कुठे पाहता येणार LIVE? टाइमिंगपासून ते स्ट्रीमिंगपर्यंत... जाणून घ्या चॅनेल आणि OTT डिटेल्स

SCROLL FOR NEXT