सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २५ ः भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रेटा मोटारीने दोन वाहनांना धडक दिली. यामध्ये पाच जण जखमी झाले. बुधवारी (ता. २५) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मोरवाडीतील पिंपरी आयुक्त बंगल्याजवळील बजाज कॉलनीसमोर हा अपघात झाला.
सद्दाम सिकंदर अत्तार (वय २७) शकील मुबारक अत्तार (२४), मोइदीन मुबारक अत्तार (३३, सर्व रा. मोरवाडी), साहिल मणियार (२२, रा. जामखेड, जि. अहिल्यानगर), अमित काटे अशी जखमींची नावे आहेत. काटे मित्रासह मोरवाडीतून केएसबी चौकाकडे किया मोटारीतून जात होते. आयुक्त बंगल्याजवळ त्यांना अचानक मोरवाडीतील एक काम आठवले. त्यामुळे ते बजाज कॉलनीतील पंचर मधून यू टर्न घेत होते. यावेळी केएसबी चौकाकडून भरधाव वेगात आलेल्या क्रेटाने कियाला एका बाजूने जोरात धडक दिली. यात काटे गंभीर जखमी झाले, तर त्यांच्या मित्राला किरकोळ दुखापत झाली आहे. क्रेटाने नंतर पुढे बँकेची रोकड नेणाऱ्या व्हॅनला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती कि ही ३५०० किलो व्हॅन पुढे ५० ते ६० फूट जाऊन भिंत आणि दुसऱ्या व्हॅनच्या मध्ये अडकली. क्रेटामधून सद्दाम, साहिल, शकील, मोईद्दीन हे चौघे जात होते. ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच संत तुकाराम नगरचे पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोरख कुंभार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पाचही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.