पिंपरी-चिंचवड

हिंजवडीची वाहतूक कोंडी, मेट्रोप्रश्नी आज बैठक

CD

पिंपरी, ता. २ : हिंजवडी आयटी पार्कसह माण आणि मारुंजी परिसराला भेडसावणारी वाहतूक कोंडी, भूसंपादनाचा तिढा आणि पायाभूत सुविधांच्‍या प्रश्‍नांवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बैठक बोलवली आहे. गुरुवारी (३ सप्टेंबर) दुपारी दोन वाजता व्हीआयपी सर्किट हाऊस येथे ही तातडीची बैठक होणार आहे.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांचे आयुक्त, ‘पीएमआरडीए’ आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, मेट्रोचे प्रतिनिधी तसेच प्रादेशिक उद्योग व वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
‘स्मार्ट आयटी सिटी संकल्प मोर्चा’ आणि ‘हिंजवडी उद्योजक असोसिएशन’देखील भूमिका मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यांसाठी तातडीने भूसंपादन पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना योग्य व वेळेत मोबदला देणे, माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कामाला गती देणे. परिसराच्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता स्वतंत्र नगरपरिषद, महापालिका अथवा सक्षम स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत ठोस धोरण ठरवण्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, या भागाची पाहणी करावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

या विषयांवरही आढावा
वाकड उड्डाणपूल आणि प्रमुख चौकांमधील दररोजची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्मार्ट सीसीटीव्हीसह अत्याधुनिक यंत्रणा उभारणे, मुळशी धरणातून किमान २ टीएमसी पाणी उपलब्ध करून देणे, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, पादचारी मार्ग आणि पथदिवे या मूलभूत सुविधांचा आढावा बैठकीत घेतला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य! प्रसाद लाड यांच्या हस्ते घेतलं पाणी, सलाईनही घेणार

Bidkin Bribe Case : टिपर सुरू ठेवण्यासाठी पोलिस हवालदाराची महिन्याला एक हजारांची मागणी; पोलिस हवालदारावर एसीबीच्या जाळ्यात

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SCROLL FOR NEXT