पिंपरी-चिंचवड

हरित चळवळीला मिळणार नवी दिशा

CD

पिंपरी, ता. ३ ः ‘सकाळ माध्यम समूह’ आणि यशदा रिॲल्टी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण चळवळ सुरू केली आहे. त्यांना आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी प्रतिसाद दिला असून रविवारी (ता. ६) पुनावळेत सामूहिक वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. यामुळे हरित चळवळीला नवी दिशा मिळण्याची वाट मोकळी झाली आहे.
वृक्ष केवळ लावायचे नाहीत, तर ते दत्तक घेऊन त्यांना नाव देणे, त्यांचे नियमित संवर्धन करणे आणि त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारायची, या ‘सकाळ’ आणि यशदा रिॲल्टीच्या संकल्पनेला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दोन हजारांपेक्षा अधिक वृक्षपालकांनी वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. त्यातून लावलेल्या प्रत्येक वृक्षाशी भावनिक नाते निर्माण व्हावे आणि त्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीने किंवा कुटुंबाने स्वीकारावी, या उद्देशाने वृक्षपालकांची संकल्पना पुढे आली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिक, संस्था, कुटुंबे, विद्यार्थी, तरुणाई आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या उपक्रमात वृक्षपालक म्हणून सहभाग नोंदवला आहे. प्रत्येक सहभागी व्यक्तीचा एक वृक्ष आणि प्रत्येक वृक्षाची एक जबाबदारी, अशा पद्धतीने ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे.

‘ग्रीन रीइमॅजिन्ड’ संकल्पना
‘ग्रीन रीइमॅजिन्ड’ संकल्पनेवर आधारित वृक्षारोपणाचा संकल्प आहे. म्हणजे ‘हिरवाईची पुनर्कल्पना’ किंवा ‘नव्या रूपात हिरवाई अर्थात वनराई’ उभारणे. या अंतर्गत वृक्षारोपणाच्या परंपरागत पद्धतीपेक्षा काहीतरी वेगळ्या, आधुनिक आणि आकर्षक पद्धतीने रोपे लावली जाणार आहेत. निसर्ग वाचवण्याच्या जुन्या संकल्पनांना आधुनिक तंत्रज्ञानासह नव्या स्वरूपात जोडण्याचा उद्देश या उपक्रमाचा आहे.

नव्या पर्वाचा भाग होऊया!
गेल्या वर्षी साधारण दोन हजार रोपांची लागवड निगडी ते देहूरोडदरम्यान केली होती. त्यात अनेक कुटुंबांनी सहभाग घेतला होता. वड, पिंपळ, चिंच, कडूलिंब अशी रोपे लावली होती. आता पुनावळेत वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यातही कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन ‘सकाळ माध्यम समूह’ आणि यशदा रिॲल्टी यांनी केले आहे. त्यासाठी ‘ग्रीन रीइमॅजिन्ड’ या नव्या पर्वाची घोषणा केली आहे.

वृक्षारोपणाबाबत...
काय? ः दोन हजारांवर वृक्षारोपणाचा संकल्प
कुठे? ः वनविभाग क्षेत्रालगत, काटे वस्ती, पुनावळे
कधी? ः रविवार, तारीख ६ सप्टेंबर २०२६
केव्हा? ः सकाळी ८ ते ११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat Santosh Chavan : संतोष चव्हाणने विद्यानंद बापट यांना का मारलं ? खरं कारण सांगितलं; मंडळाचा माजी अध्यक्ष काय म्हणाला?

Krishna Janmashtami 2026 Do's & Don'ts: गोकुळाष्टमीचा उपवास करताना 'या' गोष्टी टाळाच; श्रीकृष्णांची राहील सदैव कृपा!

अभिनंदन वर्धमान यांची हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती, गोव्यात खासगी कंपनीत करतायत काम

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या 15 मागण्या काय? सरकारची भूमिका काय? | Maratha Reservation

Marathi News Live Updates : विद्यानंद बापट यांना मारहाण केलेल्या आरोपीला उद्या कोर्टात हजार करणार - पुणे पोलीस आयुक्त

SCROLL FOR NEXT