पिंपरी-चिंचवड

कुठे प्रत्यक्ष प्रयोग; कुठे पुस्तकावरच भर

CD

प्रयोगासह प्रयोगशाळांचीही वाणवा

महापालिकेच्या माध्यमिक शाळांत सुविधांची तफावत; काही शाळांचे वर्ग प्राथमिक शाळांच्या आवारात

पिंपरी, ता. १८ : काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून विज्ञानाचे प्रत्यक्ष प्रयोग करून घेतले जातात, तर काही ठिकाणी प्रयोग होत नाहीत. त्यातच काही माध्यमिक शाळांना स्वतंत्र जागा नसल्याने प्राथमिक शाळांच्या आवारात वर्ग भरविण्याची नामुष्की ओढवली आहे. वर्गांसाठीच जागेची अडचण असताना स्वतंत्र प्रयोगशाळा आणि विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांची व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या काही शाळांमध्ये उपलब्ध सुविधांच्या मदतीने प्रयोग घेतले जातात. विद्यार्थी उपकरणे हाताळून निरीक्षणे नोंदवितात. दुसरीकडे काही शाळांमध्ये प्रत्यक्ष प्रयोग होत नसल्याने पुस्तकातील वर्णन आणि आकृत्यांवर भर राहतो. त्यामुळे विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याच्या संधीत तफावत निर्माण होत आहे. स्वतंत्र जागा नसलेल्या काही माध्यमिक शाळांचे वर्ग प्राथमिक शाळांच्या आवारात भरविले जातात. अशा ठिकाणी प्रयोगांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करणे, उपकरणे ठेवणे आणि रसायनांची सुरक्षित साठवण करणे या बाबींचे नियोजन महत्त्वाचे ठरते. माध्यमिक वर्ग चालविण्याबरोबरच त्यांच्यासाठी आवश्यक प्रयोगशाळेची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

नोंदीची पडताळणी आवश्‍यक...
प्रयोगशाळा असलेल्या शाळांमध्येही उपकरणांची स्थिती आणि वापर तपासणे आवश्यक आहे. उपलब्ध साहित्यापैकी किती कार्यरत आहे, एका संचावर किती विद्यार्थी प्रयोग करतात आणि नादुरुस्त उपकरणांची दुरुस्ती होते का, याचा शाळानिहाय आढावा घेतल्यास सुविधांचे चित्र स्पष्ट होईल. प्रयोगसाहित्य खरेदी व देखभालीचा खर्च, साठा नोंदवही आणि प्रत्यक्ष झालेल्या प्रयोगांच्या नोंदी यांचीही पडताळणी गरजेची आहे. जागेची अडचण असलेल्या आणि प्रयोग होत नसलेल्या शाळांसाठी स्वतंत्र उपाययोजना केल्यास विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांची संधी उपलब्ध होऊ शकेल.

महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये आता प्रयोगशाळा आहेत. काही ठिकाणी जागांची अडचणींमुळे सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्या लवकरच होतील.
- ममता शिंदे, उपायुक्त, महापालिका

महापालिकेचे माध्यमिक शिक्षण
तपशील - संख्या
- मराठी माध्यमाच्या शाळा - १८
- उर्दू माध्यमाच्या शाळा - ६
- एकूण माध्यमिक शाळा -२४
- एकूण शिक्षक - २८७
- एकूण विद्यार्थी - ११,०५७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT