पिंपरी, ता. २९ ः पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील प्रभाग स्तरावर स्थानिक, तातडीच्या आणि नागरी हिताच्या पायाभूत विकास कामांना गती देणे आवश्यक असते. यासाठी नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगाबाबत महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या निधीचा वापर करताना कामांचे महत्त्व, तातडी आणि नागरिकांना होणारा लाभ विचारात घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.
नगरसेवक स्वेच्छा निधीतून कामे सुचविताना एकत्रित मोठे काम, एकाच प्रभागातील विविध ठिकाणी लहान कामे किंवा बहुसदस्यीय प्रभागात एकत्रितपणे मोठे काम अशा पर्यायांचा विचार करता येणार आहे. संबंधित कामांसाठी अर्थसंकल्पात प्रत्येक नगरसेवकासाठी मंजूर असलेल्या निधीच्या मर्यादेतच खर्च करता येईल. एकापेक्षा अधिक नगरसेवकांना एकत्रित काम करावयाचे असल्यास निधीचे एकत्रीकरण सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने करता येणार आहे. नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यापूर्वी आवश्यक प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक असेल. २५ लाख रुपयांपर्यंतच्या प्रस्तावांना नियमानुसार अतिरिक्त आयुक्तांकडून प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची तरतूद आहे. २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावांसाठी स्थायी समितीची पूर्वमान्यता आवश्यक राहील. संबंधित विभागांनी विहित कार्यपद्धतीनुसार पुढील कार्यवाही करावी, असे आदेशात म्हटले आहे.
नागरी सुविधांना प्राधान्य
रस्ते, लहान पूल, पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, गटारे, समाजमंदिरे, सार्वजनिक वाचनालये, प्राथमिक शाळांमधील आवश्यक दुरुस्ती, सार्वजनिक उपयोगाच्या सुविधा, उद्याने, खेळणी व व्यायाम साहित्य, पादचारी सुविधा तसेच इतर आवश्यक नागरी कामे करता येणार आहेत. याशिवाय सार्वजनिक स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, स्मशानभूमीतील मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित कामांचाही समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.