पिंपरी-चिंचवड

सोमाटणे ग्राम सरपंच लेख

CD

एकजुटीमुळेच
जनसेवा शक्य

सोमाटणे गाव मावळ तालुक्यातील मुख्य केंद्रबिंदू. गावातून द्रुतगती महामार्ग, जुना मुंबई महामार्ग जात असून, तालुक्यातील प्रत्येक गावाला जोडणारे मुख्य दळणवळणाचे केंद्र आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांत सोमाटणे गावची प्रगती मोठ्या वेगाने झाली असल्याने आज गावातील सर्वांच्या एकजुटीतून अनेक शाश्वत कामे केली जात आहेत. गावातील एकजूट हीच गावातील विकासाचे प्रमुख कारण बनली आहे. यातूनच गावातील अनेक विकासकामे झाली.

गावाच्या विकासाची खरी ताकद लोकसहभाग असतो. केवळ शासकीय योजना किंवा प्रशासनाच्या प्रयत्नांवर विकास अवलंबून राहत नाही, तर नागरिकांचा सक्रिय सहभाग, एकत्रित जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी यामुळे शाश्वत विकास शक्य होतो. लोकसहभाग म्हणजे गावातील प्रत्येक गटाने व घटकाने विकास प्रक्रियेत योगदान देणे. श्रमदान, आर्थिक मदत, स्वयंसेवी सेवा आणि जनजागृती या माध्यमातून अनेक यशस्वी उपक्रम गावांमध्ये उभे राहिले आहेत.

लोकसहभाग महत्त्वाचा
लोकसहभाग हा लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे. गावातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय आवश्यक असतो. लोकसहभागामुळे विकासकामांची गुणवत्ता सुधारते. सामाजिक एकोपा वाढतो, शाश्वत विकास साध्य होतो. कामांमध्ये पारदर्शकता येते. स्थानिक गरजांनुसार योजना राबवता येतात. गावातील प्रत्येक व्यक्ती विकास प्रक्रियेचा भाग बनल्यास त्या गावचा सर्वांगीण विकास जलदगतीने होतो.

सांस्कृतिक व सामाजिक एकता
लोकसहभागातून सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती, लोककला व सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे सामाजिक एकोपा वाढतो आणि परंपरा जपली जाते.

महिला सक्षमीकरण उपक्रम
- महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे. बचत गट व्यवसाय, गृहउद्योग विकास, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनामुळे कुटुंब आणि समाज मजबूत होतो.
- युवकांचा सहभाग : युवक मंडळे गावच्या विकासात सक्रिय भूमिका बजावतात.

आरोग्य
गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र किंवा आशा कार्यकर्ता यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा दिल्या जातात. प्राथमिक आरोग्य सुविधा, लसीकरण कार्यक्रम, माता व बाल संगोपन सेवा, नियमित आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी, गर्भवती महिलांसाठी विशेष काळजी, पोषण योजना आणि जनजागृती कार्यक्रम राबवले जातात.

स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाय
स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह बांधणी, कचरा व्यवस्थापन आणि प्लॅस्टिक मुक्त मोहीम यामुळे रोगांचे प्रमाण कमी झाले. आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी, दंत तपासणी आणि रक्तदान शिबिरे हे उपक्रम सामाजिक संस्थेच्या सहकार्याने आयोजित केले जातात.

शिक्षण : प्रगतीची गुरुकिल्ली
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. गावातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळांमधून दिले जाते.

गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम
ई-लर्निंग साधने, संगणक प्रशिक्षण, वाचनालय व प्रयोगशाळा, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, उच्च शिक्षण व कौशल्य विकास. उच्च शिक्षण जवळच्या महाविद्यालयात मिळते.

सामाजिक बळकटीची ओळख
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आणि मार्गदर्शन केंद्र उपयुक्त ठरतात. कौशल्य विकास प्रशिक्षण, आयटीआय संगणक उपक्रम, उद्योजकता प्रशिक्षण यामुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतात. ग्रामसभेत सक्रिय सहभागासाठी स्वयंसेवी संस्था व देणगीदार या माध्यमातून गावासाठी योगदान देतात. संकटाच्या काळात पूर, दुष्काळ किंवा महामारीत ग्रामपंचायत, संस्था, नागरिक एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करतात, हेच गावच्या सामाजिक बळकटीची ओळख आहे. ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, स्थानिक संस्था, सामाजिक उपक्रम यांच्या संयुक्त प्रयत्नातून गावचा सर्वांगीण विकास साध्य होतो. प्रशासनाची कार्यक्षमता, आर्थिक नियोजन, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभाग यांच्या बळावर गावाची समृद्धी उभी राहते. ग्रामपंचायत आणि विविध संस्था यांचे सक्षम नेतृत्व समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग यामुळे गाव खऱ्या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
------------
- स्वातीताई बबन कांबळे, सरपंच, सोमाटणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe on MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! थेट 'या' ९ परीक्षांची होणार कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपूर्वी पुरावे देण्याचे कडक आवाहन

Smile Day : खळखळून हसा! एक नोव्हेंबरला साजरा करा ‘स्माइल डे’; ‘सकाळ माध्यम समूहा’चा उपक्रम

Israel Election: इस्रायल निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही! नव्या राजकीय पेचप्रसंगाचा भारतासह इराण आणि गाझावर काय परिणाम होणार?

Marathi News Live Updates : रखडलेल्या तुर्भे उड्डाणपुलासाठी ठाकरे गटाचे रास्ता रोको

RailMadad: प्रवासात तुमच्या सामानाची चोरी झाल्यास रेल्वेकडून भरपाई मिळते का? जाणून घ्या काय आहेत नियम?

SCROLL FOR NEXT