पिंपरी, ता. १० ः शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नियमित साफसफाई, कचरा संकलन व कचरा व्यवस्थापनावर भर द्यावा. व्यापार व उद्योगांना आवश्यक परवानग्या पारदर्शक व सुलभ पद्धतीने द्याव्यात, अशा सूचना महापालिका शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सभापती संजय काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या चर्चेच्यावेळी समिती सदस्या वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर, अर्चना सस्ते, सदस्य डॉ. सुहास कांबळे, उत्तम केंदळे, अनंत कोऱ्हाळे आदी उपस्थित होते. विकास आराखडा (डीपी) संदर्भातील हरकती व सूचना लवकरात लवकर निकाली काढाणे, झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना सदनिका उपलब्ध करून देणे, गरजूंना वैद्यकीय मदत पोहोचविणे आदींबाबत सूचना केल्या. नदीकाठची अतिक्रमणे हटविण्याचाही निर्णय झाला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.