पिंपरी-चिंचवड

धनत्रयोदशी उत्साहात साजरी

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ७ ः दिवाळी सणातील महत्त्वाचा दिवस असलेली धनत्रयोदशी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने नागरिकांनी सोने, चांदी, दागिने तसेच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. सराफ बाजारासह वाहनांचे शोरूम, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने आणि भांडी विक्रीच्या दुकानांमध्ये दिवसभर ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळाली.
प्रकाशोत्सव असलेल्या दिवाळीच्या सहा दिवसांच्या उत्सवाला गुरुवारी वसुबारसने प्रारंभ झाला. शुक्रवारी धनत्रयोदशीला घराघरांत धन्वंतरी आणि धनलक्ष्मीचे पूजन करण्यात आले. व्यापारी वर्गाने दुकाने आणि आस्थापनांमध्ये लक्ष्मी-कुबेर पूजन केले. अनेक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. हा दिवस वैद्यकीय क्षेत्रासाठीही महत्त्वाचा असतो. या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरीचे पूजन केले जाते. त्यामुळे शहरासह उपनगरांतील विविध दवाखाने, रुग्णालये, मेडिकल दुकाने व या क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांनी श्री धन्वंतरी देवाचे पूजन केले.

व्यावसायिकांकडून वह्यांची खरेदी
व्यावसायिकांना वर्षभर हिशेबासाठी वह्या घ्याव्या लागतात. या वह्यांची खरेदी धनत्रयोदशीच्या दिवशी केली जाते व त्यांचे पूजन बलिप्रतिपदेला म्हणजेच दीपावली पाडव्याला होते. त्यामुळे वह्या खरेदीसाठी देखील बाजारपेठेत व्यावसायिकांनी गर्दी केली होती. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा आणि खरेदी करत नागरिकांनी धनत्रयोदशीचा सण आनंदात साजरा केला. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत होता.
---
यमदीपदान
एरवी दक्षिण दिशा कोणत्याही शुभकार्यासाठी अशुभ मानली जाते; पण धनत्रयोदशीला दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावण्याची पद्धत आहे. कुटुंबात कोणाचाही अकाली मृत्यू होऊ नये म्हणून कणकेपासून दिवा बनवला जातो. दक्षिणेकडे तोंड करून त्याला हळदी-कुंकू, फुले, अक्षता वाहून पूजा केली जाते. या दिवसापासूनच दारात दिवा लावण्यास सुरुवात होते. त्यामुळे प्रत्येकाच्या दारात दिवाळीचा मिणमिणता दिवा दिसत होता.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer ID: ७/१२ वर नाव नसले तरी मिळणार शेतकरी ओळखपत्र; राज्यातील १.६ लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update: नालासोपाऱ्यात आगीच्या तांडव; दोन गाड्या जळून खाक

SCROLL FOR NEXT